लहान्याने पळविली मुलगी, मोठ्या भावाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2022 15:07 IST2022-12-01T14:58:20+5:302022-12-01T15:07:35+5:30

देव्हाडाची घटना

Girl abducted by younger brother, elder brother beaten up; A case against two in bhandara | लहान्याने पळविली मुलगी, मोठ्या भावाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

लहान्याने पळविली मुलगी, मोठ्या भावाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भंडारा : लहान भावाने मुलगी पळवून नेल्याचा आरोप करीत मोठ्या भावाला बेदम मारहाण करण्याची घटना मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली. याप्रकरणी दोघांवर करडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इसराम हंसराज नागदेवे (३३) रा. देव्हाडा असे जखमीचे नाव आहे. रात्री ८.३० वाजता तो नातेवाइकांकडील वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून मोटारसायकलने घराकडे जात होता. त्यावेळी एका घरासमोर मोठी गर्दी दिसली. त्यामुळे इसरामने आपली मोटारसायकल थांबविली असता आरोपी सतीश ताराचंद कुंभलवार (४०), विनोद माणिक कुंभलवार (३८) हे त्याच्याजवळ आले.

तुझा भाऊ ईश्वर नागदेवे याने प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेले, असे म्हणत इसरामसोबत वाद घातला. हातात असलेल्या लाकडी काठीने इसरामला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आली. या प्रकाराने घाबरलेल्या इसरामने थेट करडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून आरोपी सतीश कुंभलवार व विनोद कुंभलवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Girl abducted by younger brother, elder brother beaten up; A case against two in bhandara