अखेर 'त्या' तिन्ही गावांचा निवडणुकीवरील बहिष्कार मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 14:00 IST2024-10-03T13:49:49+5:302024-10-03T14:00:44+5:30
Bhandara : २ ऑक्टोबरचा अल्टिमेटम ठरला फायद्याचा

Finally, the election boycott of 'those' three villages is over
मुखरू बागडे
पालांदूर : लाखनी तालुक्यातील देवरी, लोकमत न्यूज नेटवर्क सायगाव व सानगाव येथील नागरिकांना जीवनावश्यक सोयी सवलती मिळत नसल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाला विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निवेदनातून इशारा देण्यात आला होता. २ ऑक्टोबरचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र २७ सप्टेंबरला उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे यांच्या अध्यक्षतेखाली साकोली येथे सकारात्मक बैठक पार पडली. सर्वच समस्यांना अधिकाऱ्यांनी होकार दिला. त्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने विधानसभेवरील बहिष्कार सर्वानुमते मागे घेण्यात आला.
सायगाव ते किटाडी रस्त्याचे खडीकरण मंजूर करण्यात आले. वाकल ते देवरी रस्त्याचे प्रकरण मंजूर प्रक्रियेत आहे. देवरी-गोंदी- सायगाव रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यावर बांधकाम नियोजित असल्याचे अभियंता दीनदयाल मटाले उपविभागीय बांधकाम अधिकारी साकोली यांनी ग्वाही दिली.
इंदिरा गांधी गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत तिन्ही गावांना सिंचनातून वगळल्याची माहिती सरपंचांनी दिली. त्यावर अध्यक्ष महोदयांनी संबंधित यंत्रणेला पत्र देत कमांड एरियामध्ये समाविष्ट करण्याचे सुचविले.
तिन्ही गावात बस सुविधा नाही. त्यावर वाहतूक नियंत्रक एकनाथ शहारे आगार साकोली यांनी रस्ते दुरुस्त होताच बस सुरू करण्याचा शब्द दिला. तिन्ही गावांतील अतिक्रमणधारकांना पट्टे मिळण्याकरिता ग्रामसेवक यांना सूचना दिली. सानगाव येथे स्मशानभूमीची जागा गट क्रमांक ९३ मध्ये उपलब्ध करून देण्याचा शब्द तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी दिला.
तिन्ही गावच्या मूलभूत समस्या निवडणुकापूर्वीच सोडविण्याचा आधार मिळाल्याने गावकऱ्यांनी एकमताने बहिष्कार मागे घेतला. उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, अभियंता दीनदयाल मटाले, शाखा अभियंता एस. एस. शेख, विस्तार अधिकारी के. डी. टेंभरे, ग्रामसेवक एम. एम. रामटेके, तलाठी रिना वालमंडाले, पोलिस उपनिरीक्षक नखाते, वाहतूक नियंत्रक एकनाथ शहारे, सरपंच उपेंद्र शेंडे, उपसरपंच रमेश खांडेकर, तमुंस अध्यक्ष प्रभू शेंडे, अनिल शिंदे, गणेश मारवाडे, गौरी मेश्राम, लक्ष्मी शंकर मेश्राम, इंदुताई दशरथ मेश्राम, अर्चना सुरेश त्रिपाठी, सचिन आगरकर उपस्थित होते.