पवनी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 14:09 IST2022-08-18T14:07:08+5:302022-08-18T14:09:35+5:30
शेतात गुरे चारण्यासाठी गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना पवनी तालुक्यातील सवरला जंगलात उघडकीस आली.

पवनी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
पवनी (भंडारा): शेतात गुरे चारण्यासाठी गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना पवनी तालुक्यातील सवरला जंगलात गुरुवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. रमेश मोतीराम भाजीपाले (६५) रा. सावरला ता. पवनी असे मृताचे नाव आहे. तो बुधवारी आपली गुरे घेऊन
चराईसाठी जंगलात गेला होता. सायंकाळी घरी परतला नाही.
त्या शोध घेतला असता रात्री थांगपत्ता लागला नाही. गुरुवारी सकाळी गावकरी व वन विभागाच्या पथकाने शोध घेतला असता सावरला बिटातील गट क्र.540 मध्ये सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे निरीक्षण केले असता वाघाने हल्ला करून यास ठार केल्याचे दिसून आले. तातडीची २० हजाराची मदत मृतकाच्या परिवाराल दिल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बारसागडे यांनी दिली आहे.