आईला शिवीगाळ करणाऱ्या लहान भावाचा पाडला मुडदा; कुऱ्हाडीने केले सपासप वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 10:57 IST2022-05-31T10:19:03+5:302022-05-31T10:57:18+5:30

घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी बेटाळा गाठून आरोपीला ताब्यात घेतले.

elder brother stabs man to death with axe for abusing mother | आईला शिवीगाळ करणाऱ्या लहान भावाचा पाडला मुडदा; कुऱ्हाडीने केले सपासप वार

आईला शिवीगाळ करणाऱ्या लहान भावाचा पाडला मुडदा; कुऱ्हाडीने केले सपासप वार

पवनी (भंडारा) : आईला शिवीगाळ केल्यावरून झालेल्या वादात मोठ्या भावाने अंगणात झोपलेल्या लहान भावाचा डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून खून केला. पवनी तालुक्यातील बेटाळा येथे रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. पवनी पोलिसांनी आरोपी मोठ्या भावाला अटक केली.

शिशुपाल पांडुरंग देशमुख (३५, रा. बेटाळा, ता. पवनी) असे मृताचे नाव आहे. तर तेजराम पांडुरंग देशमुख (४०) असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे. आईच्या मालकी शेती विकण्यावरून दोन भावांत नेहमीच भांडण होत होते. रविवारी शिशुपाल आणि तेजराम दोघेही भाऊ पवनी येथे बाजारासाठी आले हाेते. भाजीपाला खरेदी करून सोबतच दोघांनी दारू प्राशन केली आणि गावाकडे निघाले. शिशुपाल याने शेती विकून पैशासाठी आईसोबत भांडण केले हाेतो. गावी जाताना मोठ्या भावाने आईला शिवीगाळ का करतोस? असा जाब विचारला. त्यावरून वाद झाला. रात्री शिशुपाल अंगणातील चटईवर झोपला होता. त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या तेजरामने रात्री १० वाजताच्या दरम्यान कुऱ्हाडीने शिशुपालच्या डोक्यावर व मानेवर वार केले. त्यात तो जागीच मरण पावला.

घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी बेटाळा गाठून आरोपी तेजराम याला ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पवनीचे ठाणेदार जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे करीत आहेत.

Web Title: elder brother stabs man to death with axe for abusing mother