इंटर्नशिपसह मिळवा महिन्याला पाच हजार! जिल्ह्यांतील एक लाखाहून अधिक तरुणांना मोठी संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:42 IST2025-03-21T16:23:19+5:302025-03-21T16:42:18+5:30
Bhandara : ऑक्टोबरमध्ये अर्ज भरण्यास सुरुवात

Earn five thousand per month with internship! A big opportunity for more than one lakh youth in the districts
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत देशातील ७३० जिल्ह्यांतील एक लाखाहून अधिक तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे.
दरमहा पाच हजार आणि इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात जास्तीत जास्त युवकांना संधी मिळण्यासाठी भंडारा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र प्रयत्नशील आहे. त्यावर सातत्याने कार्य सुरू आहे.
१२ महिन्यांची इंटर्नशिप
योजनेंतर्गत युवकांना १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. सोबतच त्यांना दरमहा पाच हजार रुपयेही मिळतील. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर ६ हजार एकरकमी अनुदान दिले जाईल. योजनेच्या पायलट प्रोजेक्टवर अंदाजे ८०० कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती आहे.
काय आहे योजना ?
कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे. या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै २०२४ च्या अर्थसंकल्पात केली होती. ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश बेरोजगार तरुणांना योग्य संधी उपलब्ध करून देणे, हा आहे.
अर्ज कसा करायचा?
योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेबसाइटवर प्रोफाइल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करायचा आहे. उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ३ इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.
ऑक्टोबरमध्ये अर्ज भरण्यास सुरुवात
पहिल्या फेरीसाठी ऑक्टोबरमध्ये अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. या पथदर्शी टप्प्याची पहिली फेरी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झाली होती. या कालावधीत देशातील एकूण सहा लाखांहून अधिक तरुणांनी अर्ज केले होते. त्यावर या तरूणांना लाभही मिळत असल्याचे सांगण्यात आले.