चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; डोक्यात वरवंटा घालून केलं ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 12:44 IST2022-10-08T12:25:45+5:302022-10-08T12:44:00+5:30

पवनी तालुक्यातील पिंपळगावची घटना

doubting on wife's character, husband killed her by hitting on the head | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; डोक्यात वरवंटा घालून केलं ठार

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; डोक्यात वरवंटा घालून केलं ठार

प्रकाश हातेल

चिचाळ (भंडारा) : चारित्र्यावर संशय घेत डोक्यात वरवंटा घालून पत्नीला ठार मारल्याची घटना पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे शुक्रवारी रात्री घडली. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

अर्चना अरविंद रामटेके (४०) असे मृत पत्नीचे नाव आहे. आरोपी पती अरविंद माधव रामटेके (४३) याला पोलिसांनी रात्रीच तब्यात घेतले आहे. पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील अरविंद रामटेके यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदोली येथील अर्चना सोबत विवाह झाला होता. दोन वर्षापासून पत्नीच्या चरित्र चारित्र्यावर संशय घेत असल्याने नेहमीच वाद होत होता.

शुक्रवार ७ ऑक्टोंबर रोजी पती-पत्नीचे भांडण विकोपाला गेले. रात्री ८ वाजताच्या सुमारास अरविंदने घराचा दरवाजा बंद करून पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला. हा प्रकार माहित होताच गावकऱ्यांनी अर्चनाला उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून  मृत घोषित केले. मुलगा भावीक रामटेके यांच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पती अरविंद रामटेके यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक हरिश्चंद्र इंगोले, हवालदार भुमेश्वर शिंगाडे करीत आहे.

Web Title: doubting on wife's character, husband killed her by hitting on the head