लाखांदूर तालुक्यात ६१६.०३ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:36 IST2025-07-30T19:35:51+5:302025-07-30T19:36:22+5:30

Bhandara : लाखांदूर तालुका प्रशासनाची माहिती

Damage to paddy crops in an area of 616.03 hectares in Lakhandur taluka | लाखांदूर तालुक्यात ६१६.०३ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान

Damage to paddy crops in an area of 616.03 hectares in Lakhandur taluka

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर :
७ जुलै ते १० जुलैच्या सुमारास तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीने यावर्षीच्या खरीप हंगामांतर्गत लागवडीखालील शेकडो हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी शासनाकडून क्षतिग्रस्त पिकांचे पंचनाम्याचे निर्देश निर्गमित झाले होते.


या निर्देशानुसार स्थानिक लाखांदूर तालुका प्रशासनांतर्गत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. त्याअंतर्गत तालुक्यातील सिंचित व असिंचित भाग मिळून एकूण ६६१६,०३ हेक्टर क्षेत्रात धान पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती स्थानिक लाखांदूर येथील तालुका प्रशासनांतर्गत देण्यात आली आहे.


स्थानिक लाखांदूर तालुक्यातील विविध भागांत दरवर्षी खरीप हंगामाच्या सुमारास विविध सिंचन सुविधांतर्गत हजारो हेक्टर क्षेत्रात धान पिकांची लागवड केली जाते, तर तालुक्यातील कमीत कमी असिंचित भागात आवत्या धान पिकाची पेरणी केली जाते. यावर्षी खरीप हंगामात तालुक्यातील सिंचन सुविधाधारक शेतकऱ्यांनी काही हेक्टर क्षेत्रात धान पिकाची रोवणी पूर्ण केली होती, तर असिंचित भागातील शेतकऱ्यांनी काही हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड झाली होती.


पूर परिस्थितीचे पाणी शेत शिवारात गेल्याने शेतातील लागवडीखालील पिके पाण्याखाली आल्याने धान पिकाचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. प्रकरणी शासनाकडून क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश निर्गमित झाले होते. या निर्देशानुसार लाखांदूर तालुक्यातील तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पुढाकारात क्षतीग्रस्त धान पिकाचे पंचनामे करण्याचे कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे


तालुक्यातील सिंचन सुविधाधारक १ हजार ११० शेतकऱ्यांचे ६०४.८७ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर, तालुक्यातील केवळ २६ शेतकऱ्यांचे ११.१६ हेक्टर असिंचित क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.


असिंचित क्षेत्रासाठी ८ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई
राज्य शासनाकडून सन २०२३ च्या निर्देशानुसार असिंचीत क्षेत्रासाठी प्रति हेक्टर ८५०० रुपये नुकसानभरपाई ची योजना आखण्यात आली आहे, तर सिंचित क्षेत्रातील नुकसानग्रस्त पिकांसाठी प्रति हेक्टर १७ हजार रुपये नुकसानभरपाईचे प्रावधान करण्यात आले आहे. त्यानुसार सात जुलै ते १० जुलै व्या सुमारास तालुक्यातील असिंचित क्षेत्रातील क्षतीग्रस्त २६ शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर ८५०० रुपये नुकसान भरपाई, तर सिंचित क्षेत्रातील क्षतिग्रस्त १११० शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर १७ हजार रुपये प्रति हेक्टर नुकसानभरपाई उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध भागांत दरवर्षी खरीप हंगामाच्या

Web Title: Damage to paddy crops in an area of 616.03 hectares in Lakhandur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.