वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी, तुमसर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 17:03 IST2023-03-27T17:03:02+5:302023-03-27T17:03:32+5:30
या परिसरात नेहमीच वाघ दिसत असल्याची गावकऱ्यांची माहिती

वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी, तुमसर तालुक्यातील घटना
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या आरलपानी या गावातील दिलीप चव्हाण (55 वर्षे) या गुराख्यावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली.
हे संरक्षित वन असून दिलीप चव्हाण गुरे घेऊन लगतच्या जंगलात चारावयास गेला होता. दरम्यान दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वाघाने त्याच्यावर हल्ला केला. यात त्याची पाठ आणि मान गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्याला तुमसर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून वनपथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या परिसरात नेहमीच वाघ दिसत असल्याची गावकऱ्यांची माहिती आहे. मात्र, हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे.