श्रद्धा खून प्रकरणात चुलत भावाला अटक; आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2022 11:22 IST2022-12-05T11:21:14+5:302022-12-05T11:22:28+5:30

आराेपीला ९ डिसेंबरपर्यंत पीसीआर

Cousin arrested in Shraddha murder case in Bhandara; The number of accused is likely to increase | श्रद्धा खून प्रकरणात चुलत भावाला अटक; आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

श्रद्धा खून प्रकरणात चुलत भावाला अटक; आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

साकोली (भंडारा) : आठ वर्षीय चिमुकलीला ठार मारून तणसाच्या ढिगाऱ्यात जाळल्याप्रकरणी चिमुकलीचा चुलतभाऊ अजय पांडुरंग सिडाम (वय २५, रा. पापडा) शुक्रवारी पोलिसांनी संशयावरून अटक केली. साकोली न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. साकोली तालुक्यातील पापडा येथे घडलेल्या खून प्रकरणात सहा दिवसांनंतर पोलिसांच्या हाती आरोपी लागला आहे.

श्रद्धा किशोर सिडाम (वय ८) ही गत सोमवारी बेपत्ता झाल्यानंतर बुधवारी सकाळी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यात आढळून आला होता. तेव्हापासून पोलिस आरोपीचा शोध घेत होते. याबाबत पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर अटक केलेल्या अजय सिडाम याच्या नार्को चाचणी करण्याची तयारी करण्यात येत आहे. श्रद्धाचा खून कोणत्या कारणासाठी केला याची माहिती अद्याप पोलिसांनाही मिळालेली नाही. तपासणीनंतरच सत्य काय ते समोर येणार आहे.

Web Title: Cousin arrested in Shraddha murder case in Bhandara; The number of accused is likely to increase