लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; दोन ठार, चार गंभीर
By युवराज गोमास | Updated: April 19, 2023 12:01 IST2023-04-19T11:56:37+5:302023-04-19T12:01:35+5:30
मोहाडी तालुक्यातील देव्हाडा पेपर मिल जवळील घटना

लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; दोन ठार, चार गंभीर
भंडारा : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथून मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव (मोहाडी) येथे लग्न लावून परत येत असलेल्या वऱ्हाड्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यात एक जण जागीच ठार तर दुसऱ्या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेत चार जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सदर अपघात देव्हाडा पेपर मिलजवळ रात्री दीड ते दोन वाजताचे दरम्यान घडल्याची माहिती करडी पोलीसांनी दिली. टव्हेरा गाडीत एकूण सात ते आठ जण होते असे सांगितले जाते. गाडीतील सर्व जण कान्हळगाव येथील असल्याची माहिती आहे. पुढील तपास करडी पोलीस करीत आहेत.