नादुरूस्त ट्रकवर दुचाकी धडकली; एक युवक ठार, दुसरा गंभीर जखमी

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 8, 2023 17:05 IST2023-12-08T17:04:22+5:302023-12-08T17:05:00+5:30

ट्रकचालकाचा निष्काळजीपणा ठरला अपघाताला कारणीभूत.

bike collided with a broken down truck, one youth was killed another seriously injured in bhandara | नादुरूस्त ट्रकवर दुचाकी धडकली; एक युवक ठार, दुसरा गंभीर जखमी

नादुरूस्त ट्रकवर दुचाकी धडकली; एक युवक ठार, दुसरा गंभीर जखमी

गोपालकृष्ण मांडवकर, भंडारा : भंडारा-पवनी महामार्गावरील अड्याळ ते नेरला गावदरम्यान मार्गावर उभ्या असलेल्या नादुरूस्त ट्रकवर दुचाकी धडकली. यात समीर रामू सेलोटे (नवरगाव, तालुका भंडारा) हा २१ वर्षाचा तरूण जागीच ठार झाला. तर मागे बसून असलेला त्याचा मित्र आकाश नाशिक गणवीर (२१, नवरगाव) हा गंभीर जखमी झाला. ही घटना गुरूवारी रात्री ९ ते ९:३० वाजताच्या सुमारास अशोक मोहरकर महाविद्यालयाजवळ घडली. जखमी आकाशवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुासार, समीर आणि आकाश हे दोन्ही एकाच गावचे रहिवासी असून कडुली येथुन दुचाकीने (एमएच ३६, एजे ८३९९) गावाकडे निघाले होते. दरम्यान, मोहरकर महाविद्यालय समोर एमएच ४० बीएल ८१६७ क्रमांकाचा नादुरूस्त ट्रक रात्री अगदी रस्त्याच्या मधोमध उभा होता. मात्र चालकाने इंडिकेटर किंवा पार्कीग लाईट सुरू ठेवलेले नव्हते. किंवा अडथळ्यासाठी कोणतही उपाय योजना केलेले नव्हती. रात्री आपल्या दुचाकीने याणाऱ्या या दोघांची दुचाकी ट्रमला धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की समिर शेलोटे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी कलम २८३, ३३७, ३०४ (अ) भादविनुसार ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: bike collided with a broken down truck, one youth was killed another seriously injured in bhandara