व्हॉट्सॲपवर लग्नाची पत्रिका उघडण्यापूर्वी सावधान! एपीके फाईलद्वारे होतोय नवीन फ्रॉड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:42 IST2024-12-11T15:38:52+5:302024-12-11T15:42:34+5:30

Bhandara : सायबर दरोडेखोर मोबाइल मॅसेजिंग सिस्टिम हॅक करून गुगल पे, फोन पे पेमेंट ॲपचाही घेतात ताबा

Be careful before opening the wedding card on WhatsApp! New fraud is happening through APK file | व्हॉट्सॲपवर लग्नाची पत्रिका उघडण्यापूर्वी सावधान! एपीके फाईलद्वारे होतोय नवीन फ्रॉड

Be careful before opening the wedding card on WhatsApp! New fraud is happening through APK file

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाकेश्वर:
ऑनलाइन पत्रिकेच्या माध्यमातून व्हायरस मोबाइलमध्ये शिरवून अनेकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्यात आला आहे. लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. लग्नाची पत्रिका व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर पाठवण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. लग्नपत्रिका पाठवण्याचा हाच सोपा मार्ग समजला जातो. पण लग्नाची हीच पत्रिका आता लुटीचं माध्यम बनली आहे. आतापर्यंत बँकेतून बोलतोय किंवा तुमचं बैंक खातं बंद होईल अशी भीती दाखवून तुमच्या बँक खात्यांची माहिती मिळवली जात होती. पण आता सायबर भामट्यांनी लुटीसाठी नवी क्लृप्ती शोधून काढलीय. चक्क लग्नाची एपीके फाइल पाठवून मोबाइलधारकांच्या लुटीचा नवा फंडा सुरू केला आहे.


उत्सुकतेपोटी आलेली लग्नपत्रिका आपण कोणत्याही खात्रीशिवाय उघडतो. लग्नपत्रिकेच्या नावाखाली आलेला व्हायरस आपल्या मोबाइलमध्ये शिरतो. एकदा का मोबाइलमध्ये लग्नाची एपीके फाइल उघडली की व्हायरस आपलं काम करण्यास सुरुवात करतो. लग्नपत्रिका उघडल्यावर अगदी काहीवेळात आपला मोबाइल बंद पडतो. आपण जेव्हा फोन पुन्हा सुरु करतो तोपर्यंत मोबाइलमधील सगळ्या सेटिंग्ज बिघडलेल्या असतात. 


याचवेळी सायबर दरोडेखोर मोबाइल मॅसेजिंग सिस्टिम हॅक करतात. गुगल पे, फोन पे या पेमेंट ॲपचाही ताबा घेतात. इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे पासवर्ड मिळवले जातात. फोटो गॅलरीतले फोटोही सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जातात. काही घटनांमध्ये मोबाइलमध्ये सेव्ह केलेल्या आधार कार्ड, पॅन कार्डचाही गैरवापर केला जातो. 


सायबर गुन्हेगार बँक खात्यातल्या रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करतात. बैंक अकाउंट रिकामं केले जाते. गुगल पे आणि फोन पेवरून ऑनलाइन खरेदीही केली जाते. ऑनलाइन क्रेडिट कार्डाचा वापर परदेशात खरेदी करण्यासाठी वापरला जातो. याचा पत्ताही लागत नाही. कारण खरेदीचे अलर्ट देणारी मॅसेजिंग यंत्रणाही त्यांनी ताब्यात घेतलेली असते. 


खात्री करून घ्या 
मोबाइलवर अनोळखी नंबरवरून आलेली लग्नपत्रिका उघडू नका. एपीके फॉरमॅटमधील फाइल उघडण्याचा विचारच करू नका. एखाद्या मित्राची नातेवाइकाच्या नावे लग्नपत्रिका आल्यास पहिल्यांदा फोन करून खात्री करून घ्या. अन्यथा मित्र आणि नातेवाइकाच्या लग्नाच्या आनंदात तुम्ही कंगाल व्हाल.

Web Title: Be careful before opening the wedding card on WhatsApp! New fraud is happening through APK file

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.