शिकारीसाठी रानडुकराचा पाठलाग करताना डुकरासह वाघाचाही विहिरीत पडून मृत्यू

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: April 18, 2025 14:48 IST2025-04-18T14:47:42+5:302025-04-18T14:48:13+5:30

Bhandara : विनातोंडीच्या विहीरीमुळे अपघात

A tiger and a pig died after falling into a well while chasing a wild boar for hunting. | शिकारीसाठी रानडुकराचा पाठलाग करताना डुकरासह वाघाचाही विहिरीत पडून मृत्यू

A tiger and a pig died after falling into a well while chasing a wild boar for hunting.

गोपालकृष्ण मांडवकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
जंगलालगतच्या शेतशिवारात रानडुकराच्या मागे लागलेल्या वाघाचा आणि रानडुकराचाही शिहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तुमसर तालुक्यातील चिखला गावालगतच्या शेतशिवारात ही घटना घडली.

वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदल्या रात्री वाघ शिकारीसाठी रानडुकराच्या मागे लागला असावा. त्याचा पाठलाग सुरू असताना रानडुक्कर आणि वाघ हे दोघेही विहिरीत पडले असावे, असा अंदाज आहे. हे शेत चिखला येथील कवनलाल बाबुलाल धुर्वे यांच्या मालकीचे असून ते गट क्रमांक १२२ मध्ये आहे. या विहिरीला तोंडी नाही, हे विशेष !

सकाळी शेेतकरी आपल्या शेतात गेले असताना त्यांना वाघ आणि रानडुक्कर विहीरीत मृतावस्थेत तरंगत असलेले दिसले. त्यांनी वन विभागाला सूचना दिल्यावर गोबरवाहीचे ठाणेदार शरद शेवाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे, राउंड अधिकारी अशोक मेश्राम यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन दोन्ही प्राण्यांना गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले. त्यांचे शवविच्छेदन चिचोली डेपो येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बारापात्रे, डॉ. पाटील, डॉ. तुलावी यांनी केले. त्यानंतर वाघ आणि डुकरावर चिचोली डेपो येथे उपवनसंरक्षक गवई, सहाय्यक उपवन संरक्षक रितेश भोंगाडे यांच्या उपस्थित अग्नीदाह करण्यात आला.

विनातोंडीच्या विहीरीमुळे अपघात
वाघ आमि रानडुक्कर ज्या विहीरीत पडले त्याला तोंडी नव्हती. दगडाने बांधलेल्या या समतल विहीरीचा धावताना अंदाज न आल्याने एकापाठोपाठ ते दोघही विहीरीत पडले असावे, असा अंदाज आहे. विहीरीवर तोंडी न बांधणाऱ्या शेतकऱ्यावर वन विभाग कार कारवाई करणार, हे आता महत्वाचे आहे.

Web Title: A tiger and a pig died after falling into a well while chasing a wild boar for hunting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.