कपडे धुण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेचा तलावात बुडून मृत्यू

By युवराज गोमास | Updated: November 18, 2022 14:50 IST2022-11-18T14:41:51+5:302022-11-18T14:50:21+5:30

मोहाडी तालुक्यातील लेंडेझरीची घटना

A pregnant woman who went to wash her clothes drowned in the lake | कपडे धुण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेचा तलावात बुडून मृत्यू

कपडे धुण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेचा तलावात बुडून मृत्यू

भंडारा : तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना  मोहाडी तालुक्यातील लेंडेझरी येथे शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

राजकुमारी सुनिल नेवारे (30)  असे मृत महिलेचे नाव असून ती नऊ महिन्याची गर्भवती होती. शुक्रवारी सकाळी गावाजवळील हुटकाळा तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती. कपडे धुत असताना पाय घसरून खोल पाण्यात पडली. सासू शेळ्या चारुन घरी आली तेव्हा सुन घरी दिसली नाही. तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्याचे तिला कळले. तलावावर शोधण्यासाठी गेले असता पाण्यावर राजकुमारीची साडी पाण्यावर तरंगताना दिसली.

गावकऱ्यांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून राजकुमारीला करडी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती करडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार वालदे, राघोर्त, करीत आहेत. मृत महिलेच्या मागे एक तीन वर्षांची मुलगी, पती, सासू, सासरा असा आप्त परिवार आहे.

Web Title: A pregnant woman who went to wash her clothes drowned in the lake