तलावावरील मित्रांसोबत पार्टी जिवावर बेतली; एकाचा बुडून मृत्यू, गोबरवाहीत शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:23 IST2025-06-20T17:22:52+5:302025-06-20T17:23:11+5:30
तलावात बुडालेला कर्ता मुलगा : सचिनच्या मृत्यूनं कुटुंब उघड्यावर

A party with friends at a lake ended in tragedy; one drowned, mourning in the dung heap
लोकमत न्यूज नेटवर्क
गोबरवाही (भंडारा) : गावालगतच्या तलावाजवळ मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू झाला. तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या रोंघा गावात ही घटना बुधवारी (दि. १८) दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान घडली. सचिन सेवकराम धुर्वे (३१) असे या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावालगत असलेल्या तलावामध्ये ९ मित्र पार्टी करण्यासाठी गेले होते. या दरम्यान, जेवण झाल्यानंतर मित्रांना पोहण्याची इच्छा झाली. सचिनही पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. अन्य मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. तो बुडाल्याची माहिती अन्य मित्रांनी गावात दिली. सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू होते. गुरुवारी सकाळी त्याचे प्रेत बाहेर काढल्यावर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिनला वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन लहान मुले आहेत. मजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरचा कमावता गेल्याने कुटुंबावर मोठे संकट आले आहे.