महिला मजुरांना घेऊन जाणारी काळीपिवळी उलटली ; २१ महिला जखमी

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: August 1, 2025 12:36 IST2025-08-01T12:36:05+5:302025-08-01T12:36:57+5:30

Bhandara : वळणावर एका बालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात काळी पिवळी उलटल्याचे सांगण्यात येत आहे.

A bus carrying female laborers capsizes; 21 women injured | महिला मजुरांना घेऊन जाणारी काळीपिवळी उलटली ; २१ महिला जखमी

A bus carrying female laborers capsizes; 21 women injured

लाखनी (भंडारा) : रोवणी कामासाठी महिला मजुरांना घेऊन जाणारे काळी पिवळी वाहन उलटले. यात २१ महिला मजूर जखमी झाल्या. ही घटना शुक्रवार १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मासलमेटा लाखोरी वळणावर घडली.

जखमी झालेल्या महिला मजुरांना लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. वळणावर एका बालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात काळी पिवळी उलटल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: A bus carrying female laborers capsizes; 21 women injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.