बहिणीला शाळेत सोडून परतणाऱ्या भावावर काळाचा घाला
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 6, 2024 14:32 IST2024-12-06T14:31:13+5:302024-12-06T14:32:58+5:30
Bhandara : टिप्परची धडक दिली अन् जागीच झाला मृत्यू

A boy died who leaves his sister at school and returns
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सकाळच्या सुमारास दुचाकीने बहिणीला शाळेत सोडून गावी परतणाऱ्या तरुणाला टिप्परने जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. करण बांते असे या मृत तरुणाचे नाव असून तो बीड (ता. मोहाडी) येथील रहाणारा आहे. ही घटना शुक्रवार ६ डिसेंबरला सकाळी ७ वाजताच्या सुमारास बीड गावाजवळ घडली.
माहितीनुसार, करण हा दुचाकीने तिच्या बहिणीला शाळेत सोडण्यासाठी भंडारा येथे गेला होता. तिला सोडून अकपल्या बीड या गावी परत येत असताना भरधाव टिप्परने त्याला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की करणचा जागीच अंत झाला. घटनेची माहिती मिळताच वरठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. करणच्या अपघाती मृत्यूने बीड गावावर शोककळा पसरली.