घरकुलाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यात २८८२ लाभार्थी; ४९२८ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 14:48 IST2025-03-06T14:46:44+5:302025-03-06T14:48:52+5:30
४९२८ चा टार्गेट मंजूर : निधी खात्यात होणार जमा

2882 beneficiaries in the taluka in the first phase of Gharkula; 4928 Beneficiaries sanctioned Gharkul
मुखरू बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : लाखनी तालुक्यात ४९२८ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून, पहिल्या टप्प्यात २८८२ लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. थेट त्यांच्या खात्यात १५ हजार रुपयांचा निधी जमा झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू करून पावसाळ्यापूर्वी निवारा बांधण्याकरिता तळमळ सुरू केली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला ५ ब्रास वाळू अर्थात रेती मोफतचे धोरण मात्र वेटिंगवर आहे. लाखनी तालुक्याला ५०२८ च्या घरकुल टार्गेटपैकी ४९२८ मंजूर झाले आहेत. उर्वरित पात्र लाभार्थी प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येतेयं.
खासगीत रेतीचा अवाच्या सव्वा दर!
जिल्ह्यातील व लाखनी तालुक्यातील रेतीला मोठी किंमत मोजावी लागत आहे. महाराष्ट्र शासनाने मंजूर असलेला शासकीय रेती डेपो अजूनपर्यंत लाखनी तालुक्यात सुरू केलेला नाही. त्यामुळे ६०० रुपये ब्रासने मिळणारी रेती महाग झाली आहे. खासगीत चोरीच्या मार्गाने मिळणारी रेती घरकुल लाभार्थ्यांचे बजेट वाढवीत आहे.
"घरकुल लाभार्थ्यांना सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. वेळ व पैसा खर्च करण्याची आपदा लाभार्थ्यांना येऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी. मोफत रेती देण्याकरिता सुद्धा प्रशासनाने तत्परता दाखवावी."
- शामराव बेंदवार, सरपंच, मन्हेगाव
"पंचायत समिती स्तरावरून घरकुल लाभार्थ्यांची यादी तहसीलला प्राप्त होते. त्यानंतर ती यादी रेती मंजुरीकरिता ऑनलाइन पाठविली जाते. ४८० लाभार्थ्यांची पाच ब्रास रेतीकरिता नोंदणी केलेली आहे. रेती डेपो सुरू होतील."
- धनंजय देशमुख, तहसीलदार, लाखनी