फळीवर वंदना.. असं तुम्हीही म्हणता? गणपतीची आरती करताना तुम्हीही म्हणता का ‘हे’ ४ शब्द चुकीचे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:54 IST2025-08-26T15:19:21+5:302025-08-26T15:54:49+5:30
Ganesh Chaturthi 2025 : गणपती आरती (Ganpati Aarti) म्हणताना नेहमीच लोकांकडून काही चुका होतात. त्यानंतर या चुका हास्याचा विषय बनतात.

फळीवर वंदना.. असं तुम्हीही म्हणता? गणपतीची आरती करताना तुम्हीही म्हणता का ‘हे’ ४ शब्द चुकीचे?
Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाचं आगमन झालं की, सगळीकडे जल्लोषाचं वातावरण असतं. ढोल-ताशे, डीजे वाजतात. रोज वेगवेगळे उप्रकम राबवले जातात. पण दरवेळी गणेशोत्सवात एक विषय चांगलाच गाजतो. तो म्हणजे आरती (Ganpati Aarti) म्हणताना होणाऱ्या चुका. आरती म्हणताना नेहमीच लोकांकडून काही चुका होतात. आपण या चुका टाळायला हव्यात. दहा दिवस नियमितपणे बाप्पांची आरती चुकांशिवाय म्हणावी.
आरती म्हणताना अनावधानाने आपण काही चुका करतो, ज्यामुळे आरतीचा अर्थच बदलतो. जसे की आपण 'संकटी' पावावेऐवजी 'संकष्टी' पावावे असे म्हणतो. तसेच वाट पाहे 'सदना' ऐवेजी 'सजना' हा शब्द आपल्याकडून उच्चारला जातो.
चुकीचा उच्चार योग्य उच्चार
फळीवर वंदना फणीवर बंधना
संकष्टी पावावे संकटी पावावे
वाट पाहे सजना वाट पाहे सदना
निरमा निरक्षावे निर्वाणी रक्षावे
''गणपतीची आरती''
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मन कामनांपुरती॥ जय देव...
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा।
हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया॥ जय देव...
लंबोदर पीतांबर फणीवर बंधना।
सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना।
दास रामाचा वाट पाहे सदना।
संकटी पावावें, निर्वाणी रक्षावे,
सुरवरवंदना॥ जय देव...।