Anant Chaturdashi 2022 : बाप्पाला निरोप देण्याआधी काही क्षण त्याच्याजवळ बसून 'हे'मंत्र अवश्य म्हणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 15:33 IST2022-09-05T15:30:33+5:302022-09-05T15:33:55+5:30
Anant Chaturdashi 2022 : बाप्पाला निरोप देणं हे वेदनादायी असतं, म्हणून मनःशांतीसाठी तसेच त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिलेले मंत्र म्हणा!

Anant Chaturdashi 2022 : बाप्पाला निरोप देण्याआधी काही क्षण त्याच्याजवळ बसून 'हे'मंत्र अवश्य म्हणा!
पाहता पाहता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. दीड दिवसांचे, पाच दिवसांचे गणपती गेले, आता सात दिवसांचे आणि पाठोपाठ दहा दिवसांचे गणपतीही मार्गस्थ होतील. ९ सप्टेंबर रोजी यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. या दिवशी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2022) असून भाद्रपद पौर्णिमेची सुरुवातही पंचांगात दर्शवली आहे. या मुहूर्तावर बाप्पा आपल्या गावी परत जातील. जेवढ्या उत्साहात बाप्पाचे आगमन करतो, तेवढ्याच आदरपूर्वक बाप्पाला निरोप दिला पाहिजे, तरच तोही तृप्त मनाने जाताना आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जाईल.
बाप्पाला निरोप देताना बाप्पाची यथासांग पूजा करा. त्याला प्रिय लाडू, मोदकांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्व भाविकांना वाटा. बाप्पाचे विसर्जन करण्याआधी बाप्पाच्या सान्निध्यात काही काळ शांत बसून 'ओम गण गणपतये नम:' या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप करून झाल्यावर पुढील मंत्र म्हणत बाप्पाला दुर्वांची जुडी अर्पण करा.
- ॐ गणाधिपाय नम:
- ॐ उमापुत्राय नम:
- ॐ विघ्ननाशनाय नम:
- ॐ विनायकाय नम:
- ॐ ईशपुत्राय नम:
- ॐ सर्वसिद्धप्रदाय नम:
- ॐ एकदन्ताय नम:
- ॐ इभवक्त्राय नम:
- ॐ मूषकवाहनाय नम:
- ॐ कुमारगुरवे नम:
यानंतर श्री गणेशाची आरती करा आणि विसर्जनाच्या ठिकाणी नेल्यानंतर पुन्हा एकदा आरती करा आणि श्री गणेशाच्या मूर्तीला कुठेही धक्का लागणार नाही, मूर्तीचा अपमान होणार नाही याची काळजी घेत मूर्तीचे विसर्जन करा. त्यावेळेस पुढील मंत्र म्हणा...