Majalgaon Assembly will develop the constituency | माजलगाव विधानसभा मतदार संघाचा विकास करणार
माजलगाव विधानसभा मतदार संघाचा विकास करणार

ठळक मुद्देडोअर टू डोअर प्रचार : माजलगावातील मतदारांच्या गाठीभेटीत आडसकरांचे संपर्कयात्रेत आश्वासन

माजलगाव : माजलगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेशराव आडसकर यांनी शहरातील मतदारांशी संपर्क करण्यासाठी डोअर टू डोअर प्रचारावर भर देत निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.
माजलगाव मतदार संघ पूर्वीपासून भाजपसोबत राहिलेला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी रमेश आडसकर यांना पाठबळ देण्याचे आवाहन बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईनवरे यांनी या संपर्क दौऱ्यात मतदारांना केले. मतदार संघाशी आडसकर यांचे भावनिक नाते आहे. त्यामुळे त्यांना पाठबळ देण्याची गरज असल्याचे सांूगन विजयी करण्याचे आवाहन बाजार समितीचे संचालक अच्यूतराव लाटे यांनी केले.
आडसकर संपूर्ण प्रचार दौºयात तरुणाईचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. यंदा भाजपाचे उमेदवार रमेशराव आडसकर यांनाच गुलाल लावायचा असे आवाहन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी करताच सोबतचे पदाधिकारीही म्हणतात गुलाल तर रमेशराव आडसकरांनाच लागणार आहे. तुम्ही मताधिक्य वाढवा, असे मतदारांना सांगितले जात आहे. रमेश आडसकर यांच्यासोबत छत्रपती कारखान्याचे व्हाइस चेआरमन मोहन जगताप, नगरसेवक शरद यादव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.


Web Title: Majalgaon Assembly will develop the constituency
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.