माजलगाव विधानसभा मतदार संघाचा विकास करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:54 IST2019-10-13T23:53:36+5:302019-10-13T23:54:16+5:30
माजलगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेशराव आडसकर यांनी शहरातील मतदारांशी संपर्क करण्यासाठी डोअर टू डोअर प्रचारावर भर देत निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.

माजलगाव विधानसभा मतदार संघाचा विकास करणार
माजलगाव : माजलगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेशराव आडसकर यांनी शहरातील मतदारांशी संपर्क करण्यासाठी डोअर टू डोअर प्रचारावर भर देत निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.
माजलगाव मतदार संघ पूर्वीपासून भाजपसोबत राहिलेला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी रमेश आडसकर यांना पाठबळ देण्याचे आवाहन बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईनवरे यांनी या संपर्क दौऱ्यात मतदारांना केले. मतदार संघाशी आडसकर यांचे भावनिक नाते आहे. त्यामुळे त्यांना पाठबळ देण्याची गरज असल्याचे सांूगन विजयी करण्याचे आवाहन बाजार समितीचे संचालक अच्यूतराव लाटे यांनी केले.
आडसकर संपूर्ण प्रचार दौºयात तरुणाईचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. यंदा भाजपाचे उमेदवार रमेशराव आडसकर यांनाच गुलाल लावायचा असे आवाहन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी करताच सोबतचे पदाधिकारीही म्हणतात गुलाल तर रमेशराव आडसकरांनाच लागणार आहे. तुम्ही मताधिक्य वाढवा, असे मतदारांना सांगितले जात आहे. रमेश आडसकर यांच्यासोबत छत्रपती कारखान्याचे व्हाइस चेआरमन मोहन जगताप, नगरसेवक शरद यादव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.