परळीच्या निकालाची उत्सुकता शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:01 IST2019-10-24T00:01:07+5:302019-10-24T00:01:54+5:30
येथील शक्तीकुंज वसाहतीमधील क्लब बिल्डींगमध्ये परळी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

परळीच्या निकालाची उत्सुकता शिगेला
परळी : येथील शक्तीकुंज वसाहतीमधील क्लब बिल्डींगमध्ये परळी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजाता सुरु होणार आहे. दुपारी साडेबारापर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी १४ टेबल असून ५६ कर्मचारी कामकाज करणार आहेत. प्रत्येक टेबलवर दोन पर्यवेक्षक व एक सहाय्यक असून त्यांच्यावर निरीक्षणासाठी सूक्ष्म निरीक्षक राहणार आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
२१ आॅक्टोबर रोजी या मतदार संघात एकुण ७३ टक्के मतदान झाले. एकूण ३ लाख ६ हजार २०४ मतदारां पैकी २ लाख २३ हजार ३०० मतदारांनी हक्क बजावला. यात १ लाख ११ हजार ५४१ पुरुष तर १ लाख ३ हजार ७६९ स्त्री मतदारांनी मतदान केले. एकुण ३३५ मतदान केंद्रावर हे मतदान झाले.
मतमोजणीच्या एकूण २४ फेऱ्या होतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश महाडीक यांनी सांगितले.