मतदारराजाचा कौल कोणाला ? औरंगाबाद जिल्ह्यातील १२८ उमेदवारांचे भवितव्य कैद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 09:58 PM2019-10-21T21:58:16+5:302019-10-21T22:03:28+5:30

व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम जीपीएस असलेल्या वाहनांतून मतदारसंघनिहाय मोजणी करण्याच्या ठिकाणी स्ट्राँग रूममध्ये नेण्यात आल्या.

Maharashtra Election 2019 : Who is the voter king? Future of 128 candidates in Aurangabad district imprisoned | मतदारराजाचा कौल कोणाला ? औरंगाबाद जिल्ह्यातील १२८ उमेदवारांचे भवितव्य कैद  

मतदारराजाचा कौल कोणाला ? औरंगाबाद जिल्ह्यातील १२८ उमेदवारांचे भवितव्य कैद  

googlenewsNext

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ९ मतदारसंघांत १२८ उमेदवारांच्या भवितव्याचा मतदार राजाने दिलेला कौल सोमवारी ईव्हीएममध्ये कैद झाला. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होऊन ६ वाजता पूर्ण झाले. जिल्ह्याची मतदानाची अंदाजित टक्केवारी 65.45 % असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

एकूण  अंदाजित अपेक्षित टक्केवारी
104- सिल्लोड-73.01%
105- कन्नड- 69.24 %
106- फुलंब्री- 70.15%
107- औरंगाबाद मध्य- 60.12 %
108- औरंगाबाद पश्चिम- 61.32%
109- औरंगाबाद पूर्व- 61.75 %
110- पैठण- 71.03 %
111- गंगापूर-  61.18 %
112- वैजापूर- 61.77 %

जिल्ह्याची एकूण अंदाजित टक्केवारी- 65.45 %

१३ हजार कर्मचारी होते कार्यरत 
सर्व केंद्रांवर १३ हजार ३०६ अधिकारी, कर्मचारी असतील, तर ३३९ क्षेत्रीय अधिकारी आहेत. १४४ मतमोजणी अधीक्षक, २७९ आणि सूक्ष्म निरीक्षक १४४ अशा प्रकारे ५६७ मनुष्यबळ निवडणूक प्रक्रियेत कार्यरत होते.

कडेकोट बंदोबस्त
शहर आयुक्तालयांतर्गत ३,५०० स्थानिक पोलीस, ३५० होमगार्डस्, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तीन तुकड्या, तसेच राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आल्या होत्या. स्ट्रायकिंग फोर्सची २० पथके, तर ग्रामीणमध्ये स्थानिक १,८०० पोलीस, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

3024 मतदान केंद्रे 
जिल्ह्यात नऊ मतदारसंघ असून, सर्व मिळून ३०२४ मतदान केंद्रे जिल्ह्यात आहेत.  यामध्ये सहायकारी ६७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. 

मतदानासाठी ४२४० व्हीव्हीपॅट
विधानसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी  प्रथमच ४ हजार २४० व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर करण्यात आला. याद्वारे मतदान केल्यानंतर सात सेकंदांमध्ये मतदाराला पावती दिसेल. त्यावर चिन्ह, नाव व उमेदवार अनुक्रमांक असेल. त्यामुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री होणे शक्य आहे. 

ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था? 
प्रशासनाने मतदान केंद्रावर बॅलेट, नियंत्रण युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत.  ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास राखीव यंत्राची व्यवस्था आहे. यामध्ये १५८ व्हीव्हीपॅट, २५० कंट्रोल युनिट, तर ३४२ बॅलेट युनिट अतिरिक्त उपलब्ध करण्यात आल्या होत्या. 

किती उमेदवार?
मतदारसंघ    उमेदवार     मतदार
सिल्लोड    ७    ३१६९३८        
कन्नड    ८        ३१४२२२     
फुलंब्री    १३    ३२५४९१        
औरंगाबाद मध्य    ९    ३२४६६२ 
औरंगाबाद पश्चिम     १२    ३३५०५९        
औरंगाबाद पूर्व    ३४    ३१७९५८        
पैठण    १५    २९३५९९     
गंगापूर    १४    ३१२४०६     
वैजापूर     १६    ३०९४२०        
एकूण     १२८    २८४९७५५ 

जीपीएस यंत्रणा असलेल्या वाहनातून ईव्हीएम पोहोचविणार 
मतदानानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर नेण्याची व आणण्याची व्यवस्था केली आहे. व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम जीपीएस असलेल्या वाहनांतून मतदारसंघनिहाय मोजणी करण्याच्या ठिकाणी स्ट्राँग रूममध्ये नेल्या जातील.

Web Title: Maharashtra Election 2019 : Who is the voter king? Future of 128 candidates in Aurangabad district imprisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.