आजचे राशीभविष्य - १६ ऑगस्ट २०२२: घरी अवचित पाहुणे येऊन तुमची सत्वपरीक्षा पाहतील; एखाद्या व्यक्तीच्या वर्तणुकीचा त्रास होईल...!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-08-17 07:39:42 | Updated: August 17, 2022 07:39 IST

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - क्रोधाला आवर घातला पाहिजे. मनाविरुद्ध घटना घडली, तरी संयम सोडू नका. नोकरीत तुमचे वाढलेले महत्व अनेकांना रुचणार नाही. घरात आनंदी वातावरण राहील. आवडते खाद्य पदार्थ बनतील. आर्थिक आवाक सामान्य राहील.

वृषभ- संमिश्र ग्रहमान अनुभवायला मिळेल. आर्थिक आवाक चांगली राहील. मात्र अचानक काही खर्च करावे लागतील. महत्वाच्या कामात अडचणी येतील. संयमाने वागणे आवश्यक आहे. विशेषत: जीवनसाथीवर राग काढू नका. प्रवासात दगदग होईल.

मिथुन -  जनसंपर्क वाढेल. मात्र लोकांचे समाधान करणे शक्य होणार नाही. एखाद्या व्यक्तीच्या वर्तणुकीचा त्रास होईल. कायद्याची बंधने पाळा. भावंडांचे चांगले सहकार्य मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील.

कर्क - नोकरीत अडचणींना तोंड द्यावे लागेल. मनाविरुद्ध बदली किंवा कामाचा ताण यावरुन खटके उडू शकतात. घरी अवचित पाहुणे येऊन तुमची सत्वपरीक्षा पाहतील. आर्थिक आवाक चांगली राहील. मालमत्तेची कामे होतील.

सिंह -  अडचणी कमी होत आहेत, असे वाटेल. मात्र काही ना काही कटकटी चालूच राहतील. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात तुम्हाला यश मिळेल. पण संघर्ष करावा लागेल. प्रवास होईल. तुमची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जाईल.

कन्या- आर्थिक आवक चांगली राहील. मात्र सुखाने घरात बसणे होणार नाही. काहीकरी अचाट करुन दाखवण्याचे विचार मनात येतील. मात्र ते अंगलट येऊ शकतात. त्यामुळे संयमाने वागणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. कायद्याची बंधने पाळा. जोडीदार साथ देईल. 

तूळ- जीवनसाथीशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. व्यवसायात तावून सुलाखून निर्णय घ्या. आरोग्यात सुधारणा होईल. नोकरीत तुमची छाप पडेल. सहकारी मदत करतील. आर्थिक आवक सामान्य राहील. वसुली करताना अडचणी येतील.

वृश्चिक- महत्वाच्या कामात अडचणी येतील. विरोधकांचे उद्योग सुरु राहतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. जीवनसाथी खंबीर साथ देईल. भावनेच्या भरात कुणाला बोलू नका. चांगल्या बातम्या कानावर पडतील. आर्थिक बाजू सामान्य राहील

धनु- नोकरीत तुमच्या हिताचे निर्णय घेण्यास झारीतील शुक्राचार्य अडथळे आणतील. मात्र थोडासा संयम बाळगला तर संधी लवकरच मिळेल. साधा सात्विक आहार घ्या. तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ टाळा. मुलांच्या प्रगतीच्याबाबतीत बाधा येऊ शकते.

मकर- घरात कुरबुरी होतील. काही गैरसमज होतील. थोडे सबुरीने वागणे आवश्यक आहे. नोकरीत अचानक बदल होतील. अनपेक्षित जबाबदारी अंगावर पडेल. काहींना अडचणी येतील. मात्र एखादी मातब्बर व्यक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.

कुंभ- भावंडांशी गैरसमज होतील. किरकोळ कारणावरुन रुसवा फुगवा राहील. व्यवसायात अंदाज चुकू शकतात. जोखमीच्या व्यवहारात दक्ष राहणे आवश्यक आहे. नोकरीत तुमची बाजू प्रबळ राहील. जीवनसाथीचा सल्ला घ्या.

मीन- जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे वाचून मगच सही करा. खाण्या पिण्याची काळजी घ्या. उघड्यावरील पदार्थ खाऊ नका. जीवनसाथीची मर्जी राखा. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. मुलांच्या यशामुळे त्यांचे कौतुक होईल.

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :फलज्योतिष
Open in App