मेष - कामाचा ताण वाढेल. हाती घेतलेल्या महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत सहकारी, वरिष्ठ यांच्याशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. थोडे संयमाने वागा. व्यवसायात भरभराट होईल. वडीलधाच्या मडळीचा सल्ला घ्या.
वृषभ - नोकरीतील ताण तणाव कमी होईल. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीशी वाद टाळा.
मिथुन - नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यात तुमच्या कौशल्याचा पुरेपूर वापर करावा लागेल, कागदपत्रे वाचून मगच सही करा. घरी पाहुणे मंडळी येतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल.
कर्क - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सतत कार्यरत राहावे लागेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल. जीवनसाथीशी जुळवून घ्या. किरकोळ कारणावरून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. मुलांना समजून घ्या.
सिंह - महत्वाच्या कामात सफलता मिळेल. अडचणी दूर होतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. ग्रहमानाची अनुकूलता राहील.
कन्या- तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. कुणी तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्न करेल. थोडी खबरदारी घेतली पाहिजे. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.
तूळ - आपण हाती घेतलेल्या कामात अडचणी येतील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. काही गुप्तशत्रूचे मनसुबे उघड होतील. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. आत्मविश्वासाच्या जोरावर आपण यशस्वी व्हाल.
वृश्चिक - मनात सकारात्मक विचार राहतील. हाती घ्याल ते तडीस न्याल अशी परिस्थिती राहील. उत्साहाने कामे कराल. मित्र- मैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल, त्यांची चांगली साथ राहील. आर्थिक आवक चांगली राहील. भेटवस्तू मिळतील.
धनु - मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. काहींना भेटवस्तू मिळतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील, मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कार्यक्षेत्रात मनात शंका असतील.
मकर - भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. त्या जोरावर आपण आपल्या अनेक कामात सोप्या पद्धतीने यश मिळवाल. मुलांची प्रगती होईल. त्यांना योग्य संधी मिळतील. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल.
कुंभ - संयमाची परीक्षा पाहिली जाईल, शांत चित्ताने कामे करत राहा. कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो, वाहन जपून चालवा. नोकरीत तुमचे पारडे जड राहील.
मीन- अडचणी दूर होतील. कामात उत्साह राहील, जीवनसाथीवी चांगली साथ राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक आवक चांगली राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. प्रेमात सावध राहा. कुणाच्याही बोलण्याला फसू नका.
-विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)