Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ६ जून २०२३ : मकरेच्या लोकांचं नोकरीत पारडं जड राहील, धनलाभाचेही योग

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-06-06 07:28:55 | Updated: June 6, 2023 07:28 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष- ग्रहमानाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. सोप्या रीतीने कामे होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील. चांगल्या बातम्या कळतील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. समाजात तुमचा मान वाढेल.

वृषभ- महत्त्वाची कामे थोडी पुढे ढकलणे ठीक राहील. त्यामुळे तुमची दगदग होणार नाही. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. वेळेचे व्यवस्थापन नीट करा. रिकामी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. इतरांना न विचारता सल्ला देऊ नका.

मिथुन- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. मनातील मोठ्या योजना मूर्त स्वरूपात येण्यासाठी प्रयत्नांचा वेग वाढविण्याची गरज आहे. केवळ स्वप्नरंजन उपयोगी पडत नाही, हे लक्षात घ्या. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील.

कर्क- चांगल्या बातम्या कानावर पडतील. त्यामुळे प्रसन्नता राहील. इतरांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल. मात्र, तसे करताना तुमची कामे खोळंबणार नाहीत, याची काळजी घ्या. आधी आपल्या कामांचा आढावा घ्या आणि मग इतरांचा विचार करा.

सिंह- हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. सहकारी तुम्हाला मदत करतील. सार्वजनिक कार्यासाठी बराच वेळ द्याल. मात्र, कामाचा फार ताण घेऊ नका. कामानिमित्त धावपळ करावी लागेल. परीक्षांचे निकाल मनासारखे लागतील.

कन्या- ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. मौजमजा करण्यासाठी पैसा व वेळ खर्च कराल. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. नातेवाईक मंडळींसाठी वेळ द्याल.

तूळ - कार्यक्षेत्रात नवनवीन घटना घडामोडी सुरु राहतील. तुम्हाला अनुकूलता राहील. मात्र, थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. जवळच्या लोकांसाठी वेळ द्यावा लागेल. नोकरीत तुमचे महत्व सर्वांच्या लक्षात येईल. आर्थिक निर्णय सावधपणे घ्या.

वृश्चिक- कामात सफलता मिळेल. किरकोळ स्वरुपाच्या अडचणी दूर होतील. मनात कुठलीही शंका न ठेवता आत्मविश्वासाने कामे करा. नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल.

धनू - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. महत्त्वाची माहिती कळेल. एखाद्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होऊ शकतो. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. कार्यक्षेत्रात सामान्य परिस्थिती राहील.

मकर- विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. पैशाचा ओघ सुरु राहील. चैनीवर खर्च कराल. एखाद्या धार्मिक स्थळी भेट द्याल, नोकरीत तुमचे पारडे जड राहील. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. प्रवासाचे नीट नियोजन करा.

कुंभ- सकारात्मक विचार राहतील. आत्मविश्वासाने कामे कराल. सोप्या रीतीने कामे पूर्ण होतील. ज्येष्ठ मंडळीचे सहकार्य व मार्गदर्शन मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नोकरीत तुमचे पारडे जड राहील.

मीन- मुलांच्या यशामुळे आनंद होईल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. इतरांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील.

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App