Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ७ जून २०२३ : मनात आनंदी विचार राहतील, जीवनसाथीशी मधुर संबंध राहणार

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-06-07 07:34:28 | Updated: June 7, 2023 07:34 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - घरात लगबग राहील. घरातील कामे आणि नोकरी व्यवसायातील कामकाज यात तारांबळ उडेल. शांत चित्ताने कामे करत राहिल्यास ती पूर्ण होतील. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. घरी पाहुणे येतील, विविध प्रकारची खरेदी कराल. अकारण काळजी करु नका.

वृषभ- आपल्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात शंका कुशंका ठेवू नका. भावंडांच्या भेटीगाठी होतील. प्रवासाचे योग येतील. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मात्र, त्यापायी स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन- महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. मनात अकारण निराशाजनक विचार घर करतील. प्रयत्नपूर्वक सकारात्मक विचार करा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. प्रेरणादायी पुस्तक वाचा. वाहन जपून चालवा. आर्थिक आवक चांगली राहील.

कर्क- तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. भावंडांच्या सुवार्ता कानी पडतील. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.

सिंह- नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. घराच्या दुरुस्तीसाठी खर्च करावा लागू शकतो. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. महत्त्वाच्या कामात अडथळा येईल. आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वासाने कामे करत राहा.

कन्या - महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मुलांच्या प्रगतीच्या वार्ता कानी पडतील. समाजात तुमचा गौरव होईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. काहींना भेटवस्तू मिळतील. व्यवसायात प्रगती होईल.

तूळ - नोकरीत नवीन संधी मिळेल. विविध प्रकारच्या सुखसोयी वाढवून मिळतील. उच्च अधिकार आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घरी पाहुणे मंडळी येतील. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तूंची खरेदी कराल. जीवनसाथीची चांगली साथ राहील.

वृश्चिक- तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. भावंडांशी चांगले संबंध राहतील, त्यांना मदत कराल. मनात सकारात्मक विचार राहतील. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. भरभराट होईल. विवाहेच्छूंना अनुकूल काळ आहे.

धनू - महत्त्वाच्या कामत सफलता मिळेल. मात्र, त्यासाठी थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल.

मकर- विवाहेच्छूंचे विवाह जुळण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मनासारखी स्थळे चालून येतील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. लाभ होतील. मनात आनंदी विचार राहतील.

कुंभ - कामात अडचणी येतील. संयमाची परीक्षा पाहिली जाईल. काही लोक वरून गोड बोलतील. मात्र, आतून काड्या करतील. अशा लोकांना दूर ठेवलेले बरे. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, प्रवासात सतर्क राहा.

मीन- महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मुलांची योग्य दिशेने वाटचाल सुरू राहील. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल.

विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App