Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 19 ऑगस्ट 2022; मामांकडून लाभ होईल, मोठे सौदे होतील

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-08-19 07:37:57 | Updated: August 19, 2022 07:37 IST

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष- महत्वाची कामे मार्गी लागतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. आर्थिक आवक उत्तम राहील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल. मनातील बेचैनी थोडी कमी होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मुलांची प्रगती होईल.

वृषभ- अडचणी दूर होतील. मनात प्रसन्न विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. काहीना भेटवस्तू मिळतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. भावडांसमवेत मजेत वेळ घालविता येईल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. तुमचे म्हणणे ऐकले जाईल.

मिथुन- धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मात्र, काही अचानक खर्च उद्भवतील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. व्यवसायात विक्री चांगली होईल.

कर्क- अतिशय अनुकूल ग्रहमान राहील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल. विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. उत्तम प्रवास घडून येतील. जीवनसाथी, मित्र परिवार यांचे चांगले सहकार्य मिळेल. मनात आनंदी विचार राहतील.

सिंह- घरी पाहुणे येतील. सतत व्यस्त राहाल. धावपळ करावी लागेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. एखादा मोठा व फायदेशीर बदल होऊ शकतो. चांगल्या संधी चालून येतील. त्यांचा लाभ घ्या. अचानक मोठा फायदा होईल.

कन्या- भाग्याची चांगली साथ राहील. अडचणी दूर होतील. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. अचानक मोठी संधी मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. विविध प्रकारचे लाभ होतील. मित्र मंडळीचे सहकार्य मिळेल.

तूळ- अचानक धनलाभ होईल. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. घरात आनंदी वातावरण राहील. तुमचे महत्त्व वाढेल. समाजकारणात आघाडीवर राहाल. वाहन जपून चालवा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे.

वृश्चिक- अडचणी कमी होतील. महत्त्वाचे काम हाती घेण्यास हरकत नाही. त्यात यश मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. मात्र, कठोर संभाषण टाळावे. व्यवसायात भरभराट होईल. मोठे सौदे फायदेशीर ठरतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे महत्त्व वाढेल.

धनू- आरोग्याची काळजी घ्या. त्याबाबत चालढकल करू नका. मामांकडून लाभ होईल. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. मात्र, मुलांशी संवाद साधा. थोडे जुळवून घेण्याची गरज आहे. खाण्यापिण्याची काळजी घ्या. तिखट, मसालेदार पदार्थ आवडत असले तरी टाळा.

मकर- काहींना प्रवास घडून येईल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. काहींच्या मुलांना अचानक मोठी संधी मिळेल. धनलाभ होईल.

कुंभ- नोकरीत मोठी संधी मिळेल. जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल. काहींची बदली होऊ शकते. घरी पाहुणे येतील. खाण्यापिण्याची रेलचेल राहील. घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. जीवनसाथीला सफलता मिळेल.

मीन- व्यवसायात भरभराट होईल. एखाद्या मोठ्या सौद्यात फायदा राहील. मालाची विक्री चांगली, कामानिमित्त प्रवास करावा लागेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जीवनसाथीचे ऐकावे लागेल. मुलांच्या यशामुळे आनंद होईल.
 

टॅग्स :फलज्योतिष
Open in App