- विजय देशपांडे, ज्योतिष विशारद
मेष: नोकरीत कामाचा ताण कमी होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. कुणाचा अपमान होईल, असे बोलू नका. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. मुलांची प्रगती होईल. काही तरी खमंग पदार्थ खाण्यास मिळतील.
वृषभ: धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. प्रवासात सतर्क राहा. सामानाची काळजी घ्या. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. तुमच्या शब्दाला किंमत दिली जाईल. जोडीदाराशी मधुर संभाषण करा.
मिथुन: मालमत्तेची कामे तुमच्या फायद्याची ठरतील घरात तुमच्या आवडीचे पदार्थ बनतील. व्यवसायात आगेकूच कराल. इतरांना मागे टाकाल. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परता दाखवाल; पण तरीही लोकांची नाराजी राहील. मनात थोडे काळजीचे विचार राहतील.
कर्क: वडिलोपार्जित संपत्तीची कामे तुमच्या मनाप्रमाणे होतील. त्यात तुमचा फायदा होईल. विविध प्रकारच्या खाद्य पदार्थ्यांचा आस्वाद घेता येईल. शुभ वार्ता कळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नोकरीत सामंजस्य दाखवण्याची गरज आहे.
सिंह: सगळीकडे तुमचा प्रभाव पडेल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मात्र, कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. कुणाविषयी माघारी बोलताना जपून बोला.
कन्या: विविध प्रकारचे लाभ होतील. पैशांची आवक चांगली राहील. सतत कशात ना कशात स्वतःला गुंतवून घ्याल. फार मोठे साहस करू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. एखादा कार्यक्रम आयोजित केला असेल, तर ऐनवेळी त्यात अडचणी येऊ शकतात.
तूळ: आर्थिक आवक चांगली राहील. सरकारी कामात सफलता मिळेल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. तुमच्या शब्दाला मान दिला जाईल. जोडीदाराशी मधूर संभाषण ठेवा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. घरात आनंदी वातावरण राहील.
वृश्चिक: नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. अधिकार वाढवून मिळण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील. आरोग्याची काळजी घ्या. हितशत्रू डोके वर काढतील. काही चांगल्या घटना घडतील. घरात तुमचा शब्द चालेल. आर्थिक आवक ठिकठाक राहील.
धनु: भाग्याची चांगली साथ मिळेल. अनेक अडचणी दूर होतील. तुमचे महत्त्व वाढेल. प्रसिद्धी, मान-सन्मान मिळेल. मुलांच्या अडचणी समजून घेून त्यांना योग्य मार्गदर्शन करा. दूरचा प्रवास संभवतो. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष केलेले बरे. पोटाची काळजी घ्या.
मकर: घरी अनाहूत पाहुणे येतील. त्यामुळे थोडी तारांबळ उडेल. घरातील सदस्यांशी किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. नोकरीत बदलीची शक्यता आहे. नवीन कामाचा ताण राहील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घ्या.
कुंभ: प्रवासात दगदग होईल. अचानक कार्यक्रमात बदल होऊ शकतात. त्यामुळे धावपळ होईल. व्यवसायात मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. भावंडांशी वाद घालू नका. जोडीदार तुमच्या भल्याचा सल्ला देईल.
मीन: जोडीदाराशी मधूर संभाषण करा. जोडीदाराचे मन दुखावू नका. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. त्यांचे कौतुक कराल. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात अडचणी येतील. साधा, सात्विक आणि हलका-फुलका आहार घ्या.