Vrishabh Rashi Bhavishya 2023: वृषभ रास वार्षिक राशीभविष्य: हे वर्ष फिटनेसकडे लक्ष देण्याचे, त्याबरोबरच मिळणार करिअरचा ग्राफ उंचावण्याची सुवर्णसंधी!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-12-29 16:46:13 | Updated: December 29, 2022 16:46 IST

Vrishabh Rashifal 2023: मेहनती आपण आहातच, पण आरोग्यही महत्त्वाचे. कुटुंब आणि व्यवसाय याचा उत्तम समतोल राखण्यात तुमची कसोटी लागणार. अधिक वाचा... 

Open in app

२०२३ ची सुरवात आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आपल्या राशीतून होणाऱ्या मंगळाच्या भ्रमणामुळे आपला स्वभाव क्रोधीत झाल्याचे दिसून येईल. त्यामुळे आपणास काही त्रास सोसावा लागू शकतो. आपणास मानसिक तणाव सुद्धा जाणवेल. असे असले तरी हळू हळू परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल व आपण जीवनात प्रगती पथावर विराजमान व्हाल. 

हे वर्ष आपल्या आर्थिक स्थितीत चढ – उताराने भरलेले आहे. एकीकडे आर्थिक बाबतीत उत्तम परिणाम मिळून प्राप्तीत वृद्धी होत राहील तर वर्षाच्या अखेरच्या दोन महिन्यांपर्यंत आपल्या खर्चाची यादी वाढतच जाईल. आपली इच्छा असो वा नसो आपणास हे खर्च करावेच लागतील. असे असूनही नोव्हेंबर – डिसेंबर महिन्या दरम्यान आपल्या चेहेऱ्यावर हास्याची लकेर उमटेल व आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाल. 

ह्या वर्षी आपणास आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावीच लागेल, अन्यथा आजारपण येऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. ह्या वर्षात आपणास दूरवरचे प्रवास करावे लागू शकतात. आपणास परदेश प्रवासाची संधी सुद्धा मिळू शकते. अशी संधी मिळाल्यास आपण तेथे दीर्घकाळ राहू शकाल. अधिक दूरवरच्या ठिकाणी जाण्यायोग्य परिस्थिती निर्माण होऊन ह्या वर्षात आपण भरपूर प्रवास कराल. वर्षाच्या सुरवातीस सुद्धा एखादा प्रवास करावा लागू शकतो. 

आपला स्वभाव कष्टाळू असून ह्या वर्षी आपण कशाचीही तमा न बाळगता भरपूर कष्ट कराल. त्यामुळे आपणास शारीरिक थकव्याचा त्रास होऊ शकेल. जर ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर हे वर्ष आपणास सुस्थितीत नेऊन ठेवणारा आहे. कामातील व्यस्ततेमुळे आपण कुटुंबीयांपासून काहीसे दूर राहाल व त्यांना खूप कमी वेळ देऊ शकणार असल्याने आपणास कुटुंबियांशी योग्य तितका समन्वय साधावा लागेल. असे असून सुद्धा आपल्या भावंडांचे सहकार्य आपणास लाभेल. आपल्याहून एखादे मोठे भावंड असल्यास वर्षभर त्याचे सहकार्य आपणास मिळेल. वर्षाच्या उत्तरार्धात कुटुंबात एखादे शुभ कार्य सुद्धा होईल. पूजा – अर्चा करण्यात सुद्धा आपणास भरपूर खर्च करावा लागेल.

{{{{youtube_video_id####02pJovILVpA}}}}

टॅग्स :वार्षिक राशीभविष्य २०२३फलज्योतिषराशी भविष्य
Open in App