Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जून २०२३ : ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूनं राहील, सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी येईल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-06-09 07:18:02 | Updated: June 9, 2023 07:18 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - विविध प्रकारचे लाभ होतील. मात्र, मनात काही काळजीचे विचार राहतील. सरकारी कामे होतील; पण त्यासाठी दगदग होईल. आर्थिक आवक चांगली राहील. वडीलधाऱ्या मंडळीचा मान राखा. घरात चहल पहल राहील. जीवनसाथीची चांगली साथ राहील.

वृषभ - नोकरीत कामाचा ताण राहील. कामाचे स्वरूप बदलेल. नवीन शिकण्यासाठी वेळ द्यावा लागेल. घरी पाहुणे मंडळी येतील. भावंडांशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. गुंतवणुकीतून लाभ होईल. भेटवस्तू प्राप्त होतील.

मिथुन - धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे फायदे होतील. मनात काही कारणाने काळजीचे विचार राहतील. काहींना प्रवास घडून येईल. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल.

कर्क - मनात काळजीचे विचार राहतील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. एखाद्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. वाहने जपून चालवा.

सिंह - नोकरीत तुमचे पारडे जड राहील. तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जाईल. नातेवाईक व ओळखीच्या लोकामध्ये आदराचे स्थान मिळेल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वेळ द्याल. चैनीचर बन्यापैकी खर्च कराल.

कन्या - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. मुलांची काळजी घ्या. त्यांच्याशी संवाद ठेवा. खाण्या- पिण्याचे पथ्य पाळा. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मित्र-मैत्रिणीच्या भेटी होतील.

तूळ - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानी पडतील. शैक्षणिक प्रगतीपुस्तक झळकत राहील. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. सुखसोयी वाढवून मिळतील.

वृश्चिक - विविध प्रकारचे लाभ होतील. मनात आनंदी विचार राहतील. आत्मविश्वासाने वाटचाल कराल. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. नोकरीत अनुकूल घटना घडतील.

धनू- व्यवसायात सतत कार्यरत राहावे लागेल. भावडांच्या भेटीगाठी होतील. त्यांना काय हवे नको ते विचारा. जवळच्या प्रवासाचे योग येतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. जीवनसाथीच्या कलाने घ्या.

मकर - आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. त्यात तुमचा फायदा होईल. ज्येष्ठ मंडळीचा मान राखा व्यवसायात भरभराट होईल. आवडते भोजन मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.

कुंभ - तुमच्यासमोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. जीवनसाथीची चांगली साथ तुम्हाला मिळेल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्या शब्दाला किंमत दिली जाईल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील.

मीन - कामात काही ना काही कारणाने विलंब होईल. काही अडचणी येतील. प्रवासात सतर्क राहा अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मुलाची प्रगती होईल. मानसन्मान प्राप्त होईल. 

विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App