मेष- तुमच्या मनातील अनेक शंका-कुशंका दूर होतील. छोट्या-मोठ्या अडचणी संपुष्टात येतील. भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. उत्साहाने कामे कराल. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील.
वृषभ- महत्त्वाची कामे करताना काही ना काही अडचणी येतील. कामात विलंब होईल. मात्र, त्यामुळे नाउमेद होऊ नका. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अचाट साहस करण्याच्या फदात पडू नका.
मिथुन- घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. आवडते भोजन मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. तुमच्या घोलण्याला महत्त्व दिले जाईल. नोकरीत प्रगतीला वाव राहील.
कर्क- मनात आनंदी विचार राहतील. उत्साहाने कामे कराल. मात्र, कामात विलंब झाल्यामुळे थोडा हिरमोड होऊ शकतो. काही लोक तुमच्या कामात अडथळे आणतील. पण तुम्ही सकारात्मक विचार करून कामे कराल, तर अडचणी निघून जातील. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह- महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. नवनवीन योजना आखल्या जातील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. समाजात तुमचा मान वाढेल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. मुलांची प्रगती होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे.
कन्या- विविध प्रकारचे लाभ होतील. मित्रांच्या सहवासात मजेत वेळ जाईल. ओळखीचे फायदे होतील. भेटवस्तू मिळतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. नोकरीत बदलीची शक्यता आहे. कामाचा ताण राहील. घरी पाहुणे मंडळी येतील.
तूळ - व्यवसायात सतत व्यस्त राहाल. मालाची विक्री चांगली होईल. हाताला यश मिळेल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. भावंडाच्या भेटीगाठी होतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. मोठी गुंतवणूक जपून करा.
वृश्चिक- भाग्याची चांगली साथ तुम्हाला राहील. त्या जोरावर मोठी कामे हाती घेऊन ती पूर्ण कराल. मनात आनंदी विचार राहतील. हौसमौज करण्यासाठी पैसा खर्च केला जाईल. समाजात तुमचा मान वाढेल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल.
धनू - महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. उत्साहाने कामे कराल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मनात सकारात्मक विचार राहतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीत कामाचा ताण राहील.
मकर- आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, पैसे खर्च करण्याकडे कल राहील. प्रवास घडून येईल. प्रवासात सतर्क राहा. तुमची गोपनीय माहिती इतरांना सांगू नका. मनात आध्यात्मिक विचार राहतील. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील.
कुंभ- ग्रहांची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. लोकाच्या भेटीगाठी होतील. मित्र-मैत्रिणीचे सहकार्य मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल.
मीन- सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मानसन्मान मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. काहींना प्रवास घडून येईल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील.
विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)