Karka Rashi Bhavishya 2023: कर्क रास वार्षिक राशीभविष्य: वर्षाची सुरुवात थोडीशी नाजूक पण काही काळातच मनासारख्या घटनांचा काळ सुरु; वर्ष आनंदात जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-12-29 16:24:33 | Updated: December 29, 2022 16:24 IST

Karka Rashifal 2023: हे वर्ष तसे संमिश्र घटनांनी युक्त असले तरी अनेक गोष्टी मनासारख्या घडल्यामुळे मनस्थिती उत्तम राहील. 

Open in app

२०२३ चे वर्ष आपणास अनुकूल असणार आहे. वर्षाच्या सुरवातीपासूनच नशिबाची साथ आपणास मिळत असल्याचे दिसून येईल. त्यामुळे आपली बरीचशी कामे होऊ शकतील. आपली प्रलंबित कामे सुद्धा पूर्णत्वास जातील. आपण अनेक वर्षांपासून बाळगून असलेली इच्छा ह्या वर्षी पूर्ण होईल. 

ह्या वर्षी आपण भरपूर प्रवास कराल. ह्यात तीर्थयात्रेचा समावेश सुद्धा असेल, त्यामुळे आपणास मानसिक शांतता लाभेल. धर्मकार्याशी संबंधित विषयात आपली आस्था व श्रद्धा वाढून आपण अशा कार्यात सहभागी सुद्धा व्हाल. त्यामुळे आपणास मान- सन्मान सुद्धा प्राप्त होईल. आपण एखाद्या चांगल्या सामाजिक संस्थेत सुद्धा सहभागी होऊ शकाल. त्यामुळे आपणास काही नवीन काम करण्याची संधी सुद्धा मिळेल, ज्यामुळे आपला सामाजिक दर्जा उंचावेल. 

ह्या वर्षी परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता दिसत आहे. आपण जर त्यासाठी अर्ज केला नसेल तर तो लवकरात लवकर केल्यास आपणास त्यात यश प्राप्त होईल. ह्या वर्षी आपणास प्राप्ती चांगली होऊन आपला आत्मविश्वास उंचावेल. त्यामुळे आपण काही नवीन कामे हाती घेऊन त्यात यशस्वी सुद्धा व्हाल. 

मात्र, ह्या वर्षात कौटुंबिक जीवनात असंतोष बघावयास मिळेल. कुटुंबियांसह राहून सुद्धा आपणास एकटेपणा जाणवेल. आपले मन कुटुंबात रमणार नाही. आपण घरी याल ते सुद्धा एक कर्तव्य म्हणूनच. कुटुंबियांना आपले हे वर्तन रुचणार नाही व ते आपणास त्या संबंधी तक्रार करतील. 

सरकारी क्षेत्राशी चांगला संपर्क राहील. कामात प्रगती साधण्यास मदत होईल. असे सहकार्य काही मित्रांकडूनही आपणास मिळेल. कौटुंबिक बाबतीत सुद्धा आपल्या पाठीशी ते उभे राहतील. आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावू शकतील अशा काही नवीन लोकांना भेटण्याची संधी ह्या वर्षी आपणास मिळेल. ह्या वर्षी नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. भावंडांशी संबंधात सुधारणा होईल, परंतु त्यासाठी वर्षाची सुरवात काहीशी कमकुवतच होईल.

{{{{youtube_video_id####WHq_u_b2q18}}}}

टॅग्स :वार्षिक राशीभविष्य २०२३फलज्योतिषराशी भविष्य
Open in App