Yearly Horoscope 2025: कन्या राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-01-01 12:00:20 | Updated: January 1, 2025 12:00 IST

Yearly Horoscope 2025: सन २०२५ अनेकार्थाने महत्त्वाचे मानले जात आहे. नवग्रहांपैकी सर्वांत प्रभावी मानले जाणारे गुरु, शनि आणि राहु-केतु हे ग्रह या वर्षी राशी गोचर करणार आहे. त्याचा देश-दुनियेवर प्रभाव पडणार असून, कन्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

Open in app

Yearly Horoscope Virgo 2025: कन्या राशीचे वार्षिक राशीभविष्य २०२५: २०२५ च्या सुरवातीस आपणास मानसिक तणाव व बेचैनी जाणवेल. कार्यात यश न मिळाल्याने आपले मन निराश होऊ शकते. आपल्या कुटुंबियांशी असलेल्या संबंधात अहंकार आड येणार नाही याची काळजी आपणास घ्यावी लागेल. वैवाहिक जीवनात सुद्धा काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आपण व आपला वैवाहिक जोडीदार या दरम्यान काही सामान्यता राहणार नाही. ही स्थिती टाळण्यासाठी आपणास खूप प्रयत्न करावे लागतील. 

या वर्षात व्यापाराशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. मात्र, दूरवरचे प्रवास करून आपणास लाभ होईल. नशिबाची साथ मिळाल्याने वर्षाच्या उत्तरार्धात आपली प्रलंबित कामे होऊन आपण कार्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांनी अति आत्मविश्वास बाळगू नये. स्वतःवर विश्वास ठेवावा इतकेच. या वर्षात आर्थिक लाभ होण्याची संभावना असली तरी वर्षाच्या सुरुवातीस खर्चात वाढ होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. 

मार्च महिन्यानंतर व्यापारात दीर्घकालीन गुंतवणुकीतून लाभ होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश प्राप्त झाल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावेल. मित्रांची मदत होईल. वर्षाच्या सुरुवातीस कौटुंबिक जीवनात काही आव्हानांचा सामना करावा लागला तरी नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कुटुंबीय आपल्या पाठीशी उभे राहतील. 

वर्षाच्या उत्तरार्धात नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. या वर्षात शक्य तितके स्वतःला मानसिक ताणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याचा फायदा असा होईल की आपण प्रत्येक काम उत्तम प्रकारे करू शकाल. ऑक्टोबरनंतर आपल्या प्राप्तीत तेजी येईल. वर्षाचा उत्तरार्ध अनुकूल आहे. आपला प्रेम विवाह होण्याची संभावना सुद्धा आहे. या वर्षी अनेक बाबतीत आपण नशीबवान ठराल. त्यामुळे आपल्या कामात आपण यशस्वी व्हाल. 

वर्षाच्या सुरवातीस आपण परदेशात जाऊ शकता. या वर्षी आपल्या वडिलांची प्रकृती नाजूक होऊ शकते. अधून-मधून आईची काळजी सुद्धा आपणास घ्यावी लागेल. तेव्हा आपल्या आई-वडिलांची काळजी घ्या. आपण सुद्धा आपल्या आहारावर लक्ष ठेवावे. अति खाऊन आपण सुद्धा आजारी पडण्याची शक्यता आहे.
 

टॅग्स :वार्षिक राशीभविष्य २०२५फलज्योतिषराशी भविष्यनववर्षाचे स्वागत
Open in App