Yearly Horoscope 2025: तूळ राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-01-01 12:10:03 | Updated: January 1, 2025 12:10 IST

Yearly Horoscope 2025: सन २०२५ अनेकार्थाने महत्त्वाचे मानले जात आहे. नवग्रहांपैकी सर्वांत प्रभावी मानले जाणारे गुरु, शनि आणि राहु-केतु हे ग्रह या वर्षी राशी गोचर करणार आहे. त्याचा देश-दुनियेवर प्रभाव पडणार असून, तूळ राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

Open in app

Yearly Horoscope Libra 2025: तूळ राशीचे वार्षिक राशीभविष्य २०२५: २०२५ ची सुरवात आपल्यासाठी चांगली होईल. प्रकृतीत सुधारणा होईल, परंतु पार्टीचा अतिरेक झाल्याने पोटास त्रास होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी काही समस्यांचा सामना आपणास करावा लागू शकतो. याला कारणीभूत कामाच्या ठिकाणी आपण दाखवलेला आपला क्रोध असेल. एखाद्याशी भांडण सुद्धा होऊ शकते. 

या वर्षी आपणास कोणत्याही विरोधकापासून त्रस्त होण्याची किंवा घाबरण्याची आवश्यकता बिलकुल भासणार नाही. ते आपणहून स्वतःच पीछेहाट करतील. आपण आपल्या कार्यात यशस्वी व्हाल. वर्षाच्या सुरवातीस आपल्यात कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्याची जबरदस्त क्षमता असेल. आपल्या व्यापारासाठी कोणत्याही थरापर्यंत जोखीम पत्करण्यास आपण सक्षम असल्याने व्यापारवृद्धीचा नवीन मार्ग मोकळा होईल. काही नवीन कंत्राट मिळू शकतात, तसेच काही नवीन सौदे सुद्धा होऊ शकतात.

वर्षाच्या सुरवातीस आपल्या वाणीतील गोडव्याने आपली कामे पूर्ण होऊ लागतील. वर्षाची सुरवात अनुकूल आहे. जीवनात आपण खूपच रोमँटिक व्हाल. आपल्या नात्यास विवाहात परिवर्तित करण्यासाठी खूप प्रयत्न सुद्धा आपण कराल. वैवाहिक जीवनासाठी वर्षाची सुरुवात काहीशी कमकुवतच होईल. त्या नंतर परिस्थिती आपणास अनुकूल होऊ लागेल. आपल्या सासुरवाडीशी उत्तम समन्वय साधल्याचा आपणास लाभ होईल. आपण व आपला वैवाहिक जोडीदार या दरम्यान उत्तम समन्वय व रोमांस राहील. 

विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यांची एकाग्रता खूपच कमी झाल्याने त्यांना त्यावर लक्ष द्यावे लागेल. अन्यथा अभ्यासात त्यांना समस्यांचा सामना करावा लागेल. परदेशात जाण्यात अडथळे आले तरी वर्षाच्या मध्यास अनुकूलता लाभून परदेशात जाण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. या वर्षात आपणास आपल्या आहाराच्या सवयींवर लक्ष ठेवावे लागेल, अन्यथा आपण आजारी पडण्याची संभावना आहे. कौटुंबिक जीवन मध्यम राहील. 

वर्षाच्या सुरवातीस एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यात आपण यशस्वी होऊ शकता. आपली स्थगित झालेली कामे सुद्धा हळूहळू गतीमान होतील, व त्यामुळे आपण यशस्वी व्हाल. आपणास आपल्या मामाकडून लाभ होईल. या वर्षात आपली कठीण परीक्षा सुद्धा होईल. आपण जितका आळस झटकाल तितकेच जीवनात यशस्वी होऊ शकाल. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती चांगली असल्याने आपल्या कारकि‍र्दीस स्थैर्य येऊ लागेल.
 

टॅग्स :वार्षिक राशीभविष्य २०२५फलज्योतिषराशी भविष्यनववर्षाचे स्वागत
Open in App