Yearly Horoscope 2025: मिथुन राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-01-01 11:33:29 | Updated: January 1, 2025 11:33 IST

Yearly Horoscope 2025: सन २०२५ अनेकार्थाने महत्त्वाचे मानले जात आहे. नवग्रहांपैकी सर्वांत प्रभावी मानले जाणारे गुरु, शनि आणि राहु-केतु हे ग्रह या वर्षी राशी गोचर करणार आहे. त्याचा देश-दुनियेवर प्रभाव पडणार असून, मिथुन राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

Open in app

Yearly Horoscope Gemini 2025: मिथुन राशीचे वार्षिक राशीभविष्य २०२५: २०२५ च्या सुरवातीस आपल्या विचारात धार्मिकता वाढण्याची संभावना आहे. धर्म, कर्म कार्यात आपले मन जास्त रमेल. पूजा करण्यात, तीर्थयात्रा करण्यात तसेच त्यांचे दर्शन घेण्यात आपले मन रमू शकते. 

या वर्षी कौटुंबिक जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबियात आपसात वाद होऊ शकतात. आपसात समन्वयाचा अभाव असल्याने कुटुंबात अशांतता निर्माण होऊ शकते. या वर्षात प्रवास होतील, ज्यात आपल्या काही नवीन ओळखी होतील. अर्थात या प्रवासांमुळे काही शारीरिक समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात. वैवाहिक जीवनास वर्षाची सुरवात काहीशी प्रतिकूल असू शकते. आपसात ओढाताण, भांडण व तंटे होण्याची संभावना असली तरी उत्तरार्ध सुखावह होऊ शकतो. आपसातील समन्वय उत्तम असल्याने आपल्या नात्यात सुधारणा होईल. या वर्षी आपल्या प्रेमिकेसह दूरवरचे प्रवास संभवतात. 

वर्षाच्या सुरुवातीपासून आपल्या बोलण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो, ज्यामुळे आपली माणसे दुखावली जाऊ शकतात. आपल्या वाणीत माधुर्या ऐवजी कडवटपणा वाढू शकतो. आपण निष्कारण क्रोधीत सुद्धा होऊ शकता. त्यामुळे आपली माणसे दुखावले जाऊ शकतात. 

हे वर्ष विद्यार्थ्यांना काही तरी करून दाखविण्याची संधी घेऊन येत आहे. त्यामुळे त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतील. या वर्षी परदेश प्रवास सुद्धा संभवतात. आपण दूरवरचे प्रवास सुद्धा करू शकाल. आपण जर मुलां संबंधी काही स्वप्ने बघितली असली तर ती या वर्षी पूर्ण होऊ शकतील. उच्च शिक्षणात सुद्धा उत्तम यश प्राप्ती होऊ शकते. 

वर्षाच्या सुरुवातीपासून आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्री आपणास चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. या वर्षाच्या उत्तरार्धात आपल्या नोकरीत बदल संभवतो. 

वर्षाच्या सुरुवातीस व्यावसायिकांना चांगले परिणाम मिळाल्याने त्यांच्या व्यवसायाची वृद्धी होईल. आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा वाढेल. काही नवीन कंत्राट मिळाल्याने आपणास लाभ होईल. वर्षाचा उत्तरार्ध काहीसा कमकुवत होऊ शकतो.

टॅग्स :वार्षिक राशीभविष्य २०२५फलज्योतिषराशी भविष्यनववर्षाचे स्वागत
Open in App