Yearly Horoscope 2025: मकर राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-01-01 12:50:42 | Updated: January 1, 2025 12:50 IST

Yearly Horoscope 2025: सन २०२५ अनेकार्थाने महत्त्वाचे मानले जात आहे. नवग्रहांपैकी सर्वांत प्रभावी मानले जाणारे गुरु, शनि आणि राहु-केतु हे ग्रह या वर्षी राशी गोचर करणार आहे. त्याचा देश-दुनियेवर प्रभाव पडणार असून, मकर राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

Open in app

Yearly Horoscope Capricorn 2025: मकर राशीचे वार्षिक राशीभविष्य २०२५: २०२५ ची सुरवात आपली परीक्षा घेणारी आहे. आपली प्रकृती नाजूक राहू शकते. व्यावहारिक गोष्टी समोर येऊ शकतात. आपण क्रोधीत होऊन आपल्या लोकांशी दुरावा निर्माण करू शकता. तसेच रागाच्या भरात असे काही बोलाल की ते आपल्या पासून दुरावले जातील. अशा स्थितीमुळे वर्षाची सुरवात नात्यासाठी कमकुवत राहील. आपणास आपल्या वागणुकीवर लक्ष द्यावे लागेल. 

वर्षाच्या सुरुवातीस परदेशात जाण्यात यश मिळू शकते. या वर्षात आपणास खर्चातील वाढ सहन करावी लागेल. हे वर्ष सामंजस्य दाखवून निर्णय घेण्याचे आहे. नोकरी करणाऱ्यांना या वर्षाच्या सुरवातीस मोठी बचत करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्री आपल्या कामाची प्रशंसा केली जाईल. 

व्यापाऱ्यांना वर्षाच्या सुरवातीस आपल्या वागणुकीवर लक्ष द्यावे लागेल. आपले व्यावसायिक भागीदार व आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी सौहार्दाने वागूनच आपण यशस्वी होऊ शकाल. व्यापारासाठी वर्षाची सुरवात काहीशी नाजूकच आहे. अर्थात त्या नंतर परिस्थिती आपणास अनुकूल होईल. 

विद्यार्थ्यांसाठी वर्षाचा पूर्वार्ध खूपच चांगला आहे. अध्ययनात ज्याचा भविष्यात चांगला फायदा होऊ शकेल अशा चांगल्या गोष्टी त्यांना बघावयास व समजण्यास मिळू शकतात. वर्षाच्या सुरवातीस आपणास चांगली आर्थिक प्राप्ती होईल. प्रवासावर काही पैसा खर्च झाला तरी प्राप्ती चांगली होऊन बँकेतील शिल्लक सुद्धा वाढेल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल, ज्याचा आपण वेळोवेळी आनंद सुद्धा घेऊ शकाल. 

आपले कुटुंबीय आपल्या पाठीशी राहतील. भावंडांशी आपला समन्वय उत्तम राहील. प्रणयी जीवनासाठी वर्षाची सुरुवात चांगली होईल. आपण आपल्या भावना प्रेमिकेसमोर व्यक्त करू शकाल. विवाहितांसाठी वर्षाची सुरवात काहीशी प्रतिकूल असू शकते. आपसातील भांडण टाळावे. विवाहितांना आपल्या जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. आपल्या जोडीदाराचा कुटुंबियांशी समन्वय साधण्यासाठी आपणास पुढाकार घ्यावा लागेल.

आरोग्याप्रती सुद्धा आपणास जागरूक राहावे लागेल. त्यामुळे आपली प्रकृती चांगली राहून मानसिक दृष्ट्या चांगला अनुभव घ्याल. आपण चांगला निर्णय घेऊन आपले जीवनमान उंचावू शकाल. विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरवाती पासून चांगले परिणाम मिळू लागले तरी त्यांना सातत्य टिकवून ठेवावे लागेल.
 

टॅग्स :वार्षिक राशीभविष्य २०२५फलज्योतिषराशी भविष्यनववर्षाचे स्वागत
Open in App