राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र २५, १९४५. तिथी चैत्र कृष्ण दशमी (रात्री ८४६ पर्यंत शालिवाहन शके १९४५. शोभन नाम संवत्सर, नक्षत्र सकाळी ७:३६ पर्यंत श्रवण, त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री पहाटे ५:५१ पर्यंत धनिष्ठा. रास सायंकाळी ६:४४ पर्यंत मकर. त्यानंतर कुंभ आज सामान्य दिवस. सायंकाळी ६:४५ पासून पंचक, राहू काळ : सकाळी ९ ते १०:३०. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)
मेष- ग्रहमान तुमच्या प्रगतीला पूरक असे राहील. नोकरीत नवीन संधी मिळतील. भविष्यात फायदा होईल, अशा संधी नजरेच्या टप्यात येतील. आर्थिक आवक चांगली राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल.
वृषभ- जवळच्या प्रवासाचे योग येतील. मित्र-मैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. अधिकारी वर्गाचि सहकार्य मिळेल. जोडीदार चांगली साथ देईल.
मिथुन- महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या नंतर हाती घ्या. काही कामे पुढे ढकलली तर बरे होईल. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो; मात्र व्यवहार जपून करा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. रहदारीचे नियम पाळा. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील.
कर्क- महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या आत आटोपून घ्या. कामे रेंगाळत ठेवता कामा नये. रात्रीचा प्रवास शक्यतो टाळलेला बरे राहील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. एखाद्या उलाढालीत अचानक धनलाभ होऊ शकतो. मनात सकारात्मक विचार ठेवा.
सिंह- फार दगदग होईल, अशी कामे करू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विरोधकांकडे दुर्लक्ष करा. तुमच्या योजना इतरांना सांगत बसू नका. लोक त्यात विघ्ने आणण्याचा प्रयत्न करतील. महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या नंतर हाती घ्या.
कन्या- महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या आत आटोपून घ्या. महत्वाचे निरोप येतील. मुलांची काळजी वाटेल, त्यांना योग्य मार्गदर्शन करा. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. जवळच्या प्रवासाचा योग येईल.
तूळ - विविध ५ उपक्रमांची रेलचेल राहील. त्यात आपण व्यस्त राहाल. सतत जनसंपर्क राहील. लोकांच्या तुमच्याकडून जास्त अपेक्षा राहतील. त्यामुळे तुम्हाला स्वतः साठी वेळ देणे जमणार नाही. सायंकाळी फुरसत मिळेल. प्रवास शक्यतो टाळलेला बरा राहील.
वृश्चिक- आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. आपण भले आणि आपले काम भले, असे धोरण ठेवा. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. सहलीला जाऊन याल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील.
धनू - कार्यक्षेत्रात तुमची बोलवाला राहील. तुमचा सल्ला लोकांना पटेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांना मदत करावी लागेल. प्रवासात दगदग होईल. नीट नियोजन करून प्रवास करा.
मकर- मनात आनंदी विचार राहतील. विविध प्रकारचे लाभ होतील. विविध क्षेत्रांत यश मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. खाण्या- पिण्याची चंगळ राहील. एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण येईल. व्यवसायात भरभराट होईल. मुलांचे कौतुक होईल.
कुंभ महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या नंतर हाती घ्या. तोपर्यंत कामाची पूर्वतयारी करावी. निष्कारण पैशाची उधळपट्टी करू नका. लोकांनी भरीस पाडले तरी खर्चाच्या बाबतीत संयम बाळगण्याची गरज आहे. आवडते भोजन मिळेल.
मीन- महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या आत आटोपून घेतलेली बरी. विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक आवक चांगली राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी संवाद साधून महत्त्वाची माहिती कळेल. संध्याकाळी अनावश्यक खर्च टाळा. -विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)