आजचे राशीभविष्य- ०४ एप्रिल २०२३: दिवसाची सुरुवात थोडी चाचपडत होईल; मात्र ग्रहमान हळूहळू अनुकूल होईल, प्रवासात सतर्क राहा

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-04-04 07:22:36 | Updated: April 4, 2023 07:22 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १४, १९४५. तिथी चैत्र शुक्ल त्रयोदशी (सकाळी ८:०६ पर्यंत) शालिवाहन शके १९४५. शोभन नाम संवत्सर, नक्षत्र : सकाळी ९:३६ पर्यंत पूर्वा, त्यानंतर उत्तरा रास दुपारी ४:०६ पर्यंत सिंह. त्यानंतर कन्या, आज चांगला दिवस, भगवान महावीर जयंती. राहू काळ: दुपारी ३ ते ४:३०. राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)

मेष- महत्त्वाची कामे आपण सायंकाळच्या आत आटोपून घ्या. त्यानंतर विरोधकांकडून तुमच्या कामात अडथळे आणले जाऊ शकतात. खाण्यापिण्याची काळजी घ्या. नाही तर पोट बिघडू शकते. आराम करा. जीवनसाथी चांगली साथ देईल, योग्य सल्ला मिळेल.

वृषभ- दिवसाच्या सुरुवातीला नोकरीत कामाचा ताण राहील. मात्र आपण नियोजनबद्ध पद्धतीने कामे केल्यास कामे पूर्ण होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ देणे शक्य होईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानी पडतील. महत्त्वाचे निरोप येतील. परीक्षेत यश मिळेल.

मिथुन- कामात उत्साह राहील. सतत कार्यरत राहाल. जवळच्या लोकांच्या सहवासात याल. प्रवास घडून येतील. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. कामाचे स्वरूप बदलेल. आर्थिक आवक चांगली राहील. भेटवस्तू मिळतील.

कर्क- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. कामात उत्साह राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. प्रवासाचा बेत ठरेल. व्यवसायात भरभराट होईल.

सिंह- हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. त्यामुळे मन आनंदित राहील. आर्थिक आवक चांगली राहील. आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. नोकरीत अनुकूल वातावरण राहील.

कन्या- महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या नंतर हाती घ्या. तोपर्यंत फार दगदग न करता कामाचे नियोजन करून ठेवा. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. योग्य सल्ला मिळेल. व्यवसायात यशस्वी व्हाल. काहींना प्रवास घडून येईल. प्रवासात सतर्क राहा.

तूळ- महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या आत आटोपून घ्या. ग्रहमानाच्या अनुकूलतेचा वेळीच फायदा घ्या. काहीना प्रवास करावा लागेल. प्रवासात काळजी घ्या. अनावश्यक खर्चाला आवर घाला. वसुलीची कामे दुपारच्या आत संपवली तर बरे राहील.

वृश्चिक- ग्रहमान अनुकूल राहील. कामांना गती मिळेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. त्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळेल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. महत्त्वाचे निरोप येतील. अनुकूल घटना घडतील. भाग्याची चांगली साथ राहील.

धनू- तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. हातून समाजसेवा घडेल, मौजमजा करण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. मुलांच्या यशामुळे आनंद होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्याना चांगला काळ आहे. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामाचा ताण कमी राहील.

मकर- महत्त्वाची कामे सायंकाळच्या वेळी हाती घ्या. फार दगदग होईल अशी कामे करू नका, वाहन जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. मसालेदार, तिखट पदार्थाचे सेवन करणे टाळले पाहिजे. चांगल्या बातम्या कळतील. व्यवसायात यशस्वी व्हाल.

कुंभ- महत्त्वाची कामे सायंकाळच्या आत पूर्ण करा. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रवासात दगदग होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

मीन- दिवसाची सुरुवात थोडी चाचपडत होईल. मात्र ग्रहमान हळूहळू अनुकूल होईल. महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या नंतर करा. आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथी चांगली साथ देईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.

-विजय देशपांडे ज्योतिषविशारद

टॅग्स :फलज्योतिष
Open in App