आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२३: नोकरीत वर्चस्व राहिल, प्रेम प्रकरण यशस्वी होईल, मनावरचा ताण हलका होईल!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-04-26 07:29:17 | Updated: April 26, 2023 07:29 IST

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Open in app

मेष- ग्रहमानाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. व्यापारात प्रगतिपथावर राहाल. मोठे सौदे फायदेशीर ठरतील. जवळच्या मित्रांसमवेत सहलीला जाऊन याल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल.

वृषभ- हाती घ्याल ते तडीस न्याल अशी परिस्थिती राहील. मनात आत्मविश्वास राहील. त्यामुळे झटपट कामे होतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. जोडीदार तुमची काळजी घेईल. आशादायी विचार राहतील.

मिथुन- नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. काहींना मोठे पद मिळेल. आर्थिक आवक राहील. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. चांगले प्रस्ताव समोर येतील. विविध प्रकारचे लाभ होतील. प्रेम प्रकरण यशस्वी होईल. भेटवस्तू मिळतील.

कर्क- तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. लोक तुमचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे.

सिंह- आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. हाती घ्याल ते तडीस न्याल अशी परिस्थिती राहील. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. उलाढालीत मोठा फायदा होईल. लोकांना स्वतःहून सल्ला देत बसू नका.

कन्या- जनसंपर्क चांगला राहील. लोकांच्या उपयोगी पडाल. मनात सकारात्मक विचार राहतील. नोकरीत महत्वाच्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नवीन कल्पना विकसित केल्या जातील.

तूळ- नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील. चांगल्या घटना घडतील. अनुकूल परिस्थिती राहील. मौजमजा करण्याच्या उद्देशाने फिरणे होईल. समाजात तुमचा गौरव होईल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या प्रगतीला चालना मिळेल.

वृश्चिक- व्यापारात सतत कार्यरत राहाल. मोठ्या उलाढालीत फायदा होईल, जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलणे ठीक राहील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. वाहन जपून चालवा. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल.

धनू- ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. मनावरचा ताण हलका होईल. व्यवसायात यश मिळेल. नवीन प्रयोग करून पाहिले जातील. तुमच्या प्रगतीला पूरक वातावरण राहील. मोठी गुंतवणूक करताना जाणकार मंडळीचे मत विचारात घ्या.

मकर- नोकरीत प्रगतीला वाव राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. शिक्षणात प्रगती होईल. मुलांचे कौतुक होईल.

कुंभ- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. विक्रीचे प्रमाण चांगले राहील. काहीना सहलीला जाण्याचा योग येईल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. लोकांच्या उपयोगी पडाल. घरात आनंदी वातावरण राहील.

मीन- नोकरीत अनुकूल स्थिती राहील. नवीन संधी मिळेल. तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जाईल. घरी पाहुणे मंडळी येतील, एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले। जाईल, मालमत्तेची कामे जपून करा. व्यवसायात भरभराट होईल.

टॅग्स :फलज्योतिष
Open in App