मेष- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. मोठे प्रकल्प हाती घेण्यात रस राहील. तुमच्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळेल. कामात लक्ष लागेल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल, धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नवीन संधी मिळतील.
वृषभ- आर्थिक व्यवहार जपून करा. चटकन कुणावरही विश्वास ठेवू नका. खबरदारी घेतली पाहिजे. महत्त्वाची कामे पुढे ढकलणे ठीक राहील. प्रवासात सतर्क राहा. तुमचा पिन, ओटीपी, पासवर्ड इत्यादी माहिती फोनवरून कुणाला देऊ नका.
मिथुन- अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेली कामे होतील. त्यामुळे मनाला हायसे वाटेल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. बाजारपेठेचा अभ्यास करून मोठ्या गुंतवणुकीचे निर्णय घेतले पाहिजेत, जाणकाराच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका,
कर्क- कामाच्या रामरगाड्यातून स्वतः साठी वेळ काढा. कामांचे नीट नियोजन करून कामे करा. त्यामुळे श्रमसाफल्याचा आनंद घेता येईल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या उपयोगी पडाल. नोकरीत तुमचे नाव होईल. धनलाभ होईल.
सिंह- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. स्वतः कडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. प्रगतीला वाव मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. आर्थिक परिस्थिती बळकट राहील.
कन्या- महत्त्वाची कामे पुढे ढकलणे ठीक राहील, नाही तर . विनाकारण जास्त पैसा व वेळ खर्च होईल. तसेच मनस्ताप सहन करावा लागेल. वाहने जपून चालवा. प्रवासात सतर्क राहा. लोकांच्या भानगडीत पडू नका. दगदग होईल अशी कामे टाळा.
तूळ- कामाचा ताण राहील. महत्वाची कामे पुढे ढकलली तर बरे होईल. काही लोक तुमचा मानभंग करण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यांच्या तोंडी लागण्यात वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आपले काम वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे योग्य राहील.
वृश्चिक- व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. भागीदारांचे चांगले सहकार्य मिळेल. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. संयम बाळगण्याची गरज आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आराम करणे चांगले राहील.
धनु- एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमचे महत्त्व वाढेल. लोक तुमची प्रशंसा करतील, नोकरीत कामाचा ताण वाढेल. कामानिमित्त फिरणे होईल. कामावे. नीट नियोजन करण्याची गरज आहे. मुलांना योग्य मार्गदर्शन करा. त्यांच्याशी संवाद साधा.
मकर- संयमाने वागण्याची गरज आहे. मित्र, नातेवाईक यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवू नका. नाही तर अपेक्षाभंग होऊन मनःस्ताप सहन करावा लागेल, व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. कागदोपत्री व्यवहार जपून करा. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या.
कुंभ- नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जाईल. तुमच्या मागण्या मान्य केल्या जातील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. इतरांकडून अपेक्षा करू नका.
मीन- व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरु राहील. सतत कार्यरत राहावे लागेल. मात्र फायदा झाल्यामुळे कामाचा ताण जाणवणार नाही. मालमत्तेची कामे काही कारणाने रेंगाळतील. चोरी, नुकसान या पासून सावध राहा.