मेष- आपल्या अनेक अडचणी दूर होतील. काही तरी नवीन करून दाखवण्याची इच्छा राहील. मनात आनंदी विचार राहतील. उत्साहाने कामे कराल. जीवनसाथीची चांगली साथ मिळेल. प्रेम प्रकरणात सावध राहण्याची गरज आहे. आर्थिक आवक चांगली राहील.
वृषभ- महत्त्वाच्या कामात अडथळा येईल. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. प्रवासात सतर्क राहा. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. अनोळखी व्यक्तीशी बोलताना आपली गोपनीय माहिती कळू देऊ नका. उसने पैसे देताना विचार करून द्या.
मिथुन- आर्थिक उलाढाली जपून करा. आर्थिक फसवणुकीपासून सावधान राहा. देवाण-घेवाण, करार- मदार करताना खबरदारी घ्या. पैसे मिळतील; पण खर्चही होतील... प्रवासात सतर्क राहा. महत्त्वाच्या घडामोडी घडतील. काही निरोप येतील.
कर्क- नोकरीत कामाचा ताण राहीन. घरी अनपेक्षित पाहुणे येतील. त्यामुळे तारांबळ उडेल. हाती घेतलेल्या प्रकल्पात तुमच्या कौशल्याची परीक्षा पाहिली जाईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र सतत कार्यरत राहावे लागेल. प्राधान्यक्रम ठरवून कामे करा.
सिंह- नवीन संधी उपलब्ध होतील. मनात आनंदी विचार राहतील. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. अनेक अडचणी दूर होतील. नवीन माहिती कळेल. समाजात नावलौकिक वाढेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. आर्थिक आवक चांगली राहील.
कन्या- महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. आपल्या संयमाची परीक्षा पाहिली जाईल. कामे आरामात झाली तरी चालतील, असे धोरण ठेवण्यात हित आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा, प्रवास शक्यतो टाळा. वादापासून दूर राहा. इतराना सल्ला देऊ नका.
तूळ- व्यवसायात सतत व्यस्त राहाल. काही ना काही अडचणी असतील. जीवनसाथीशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. मनात काळजीचे विचार राहतील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत कामाचा ताण राहील.
वृश्चिक- महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. फार दगदग होईल अशी कामे करू नका. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. आरोग्याची काळजी घ्या.
धनू- नोकरीत सतत कार्यरत राहावे लागेल. एक काम संपले की दुसरे काम पुढे उभे राहील. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. नवनवीन उपक्रम राबविले जातील. मुलाची काळजी घ्या. काहींना जवळच्या प्रवासाचे योग येतील.
मकर- व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. मात्र भागीदारी व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याची गरज आहे. घरात काही ना काही कारणाने गैरसमज होतील. वाद होऊ शकतात. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. त्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद होईल.
कुंभ- कामानिमित्त जवळचे प्रवास घडून येतील. प्रवासात सतर्क राहा. भावंडांशी वाद टाळा. मित्रांशी. गैरसमज होऊ शकतात. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. स्वतःच्या राहणीमानाकडे लक्ष द्या.
मीन- वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात अडचणी येतील. जमिनीच्या व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या. कागदोपत्री व्यवहार करताना अटी वाचून मगच सही करा. व्यवसायात भरभराट होईल. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे सांभाळा.