मेष- सामान्य दिवस राहील. विशेष बदल असणार नाहीत. काही कामे रेंगाळत पडतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. तुमच्या हातून सत्कृत्ये घडतील. आवडत्या खाद्य पदार्थाचा आस्वाद घेता येईल. आर्थिक आवक राहील. तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जाईल.
वृषभ- आर्थिक समाधानकारक राहील. प्राप्तीचे प्रमाण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. काहींना भेटवस्तू मिळतील. जनसंपर्क चांगला राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आवडत्या छंदासाठी वेळ काढा.
मिथुन- तुमच्या हातून चांगली कामे घडतील. वरिष्ठाकडून शाबासकी मिळेल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. व्यवसायात विक्री. चागली होईल. तुमचे मत विचारात घेतले जाईल नातेवाइकाच्या भेटीगाठी होतील घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.
कर्क- ग्रहमानाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. सामाजिक उपक्रमात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. प्रसिद्धी मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मनात सकारात्मक विचार राहतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल.
सिंह- महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. प्रलंबित कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करा. नोकरीत अनुकूल घटना घडतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मुले प्रगती करतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
कन्या- विवाहेच्छूचे विवाह जुळतील. त्यासाठी थोडा प्रयत्न करण्याची गरज आहे. ओळखीच्या लोकाची चांगली साथ राहील. व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू राहील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल, आळस झटकून कामे करत राहा. वेळेचा अपव्यय करू नका.
तूळ- लोकांशी सतत सवाद ठेवण्याची गरज राहील. त्याशिवाय आपली कामे पूर्ण होणार नाहीत. हितशत्रूपासून सावध राहा. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. थोडा आराम करण्याची गरज आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामात विलंब होईल.
वृश्चिक- एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील. लोक तुमची प्रशंसा करतील. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. मनात सकारात्मक विचार राहतील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल, मुलांचे कौतुक होईल. सफलता प्राप्त होईल.
धनू- नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल, कामाचा ताण कमी होईल. त्यामुळे आवडत्या छंदासाठी वेळ काढणे. शक्य होईल. विविध प्रकारचे लाभ होतील. कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. मधुर संभाषण करा. लोकाच्या भेटीगाठी. होतील.
मकर- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. लोकांची चांगली साथ राहील. शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्यांना चांगला काळ आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. काहींना पुरस्कार मिळतील. तुमच्या कामाची योग्य प्रकारे दखल घेतली जाईल.
कुंभ- हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सोप्या पद्धतीने यश मिळेल. व्यवसायात हाताला सतत काम राहील. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे.
मीन- विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करता येईल. मनात उत्साह राहील. चपळपणे कामे हातावेगळी कराल, नातेवाइकाच्या भेटी होतील. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.