Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य १६ सप्टेंबर २०२२, वृषभ राशीला प्रेमात प्रतिसाद, तर या राशींना होणार धनलाभ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-09-16 08:06:06 | Updated: September 16, 2022 08:06 IST

Today Daily Horoscope, 16th September 2022: कसे असेल तुंमचे आजचे राशीभविष्य, जाणन घ्या सविस्तर 

Open in app

मेष - अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखादी मोठी संधी मिळेल. त्यामुळे तुंमचा फायदा होईल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. घरात आनंदी वातावरण राहील. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. 

वृषभ - सगळ्या अडचणी दूर होतील. मन प्रसन्न राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील. तरुण वर्गाला प्रेमात प्रतिसाद मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. 

मिथून - अचानक प्रवास करावा लागेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. भावंडांचा सल्ला घ्या. व्यवसायात विक्री चांगली होईल. जनसंपर्क चांगला राहील. 

कर्क - अनुकूल वातावरण राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. लोकांचे सहकार्य मिळेल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. अचानक धनलाभ होईल. लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. वारसा हक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ होईल. 

सिंह - धनलाभ होण्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. नकळत काही लाभ होतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. घरी पाहुणे येतील. मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. 

कन्या - भाग्याची चांगली साथ राहील. अडचणी संपुष्टात येतील. दगदग कमी होईल. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवास कार्यसाधक ठरतील. प्रसिद्धी मानसन्मान मिळेल. मुलांना चांगल्या संधी मिळतील. मनात सकारात्मक विचार राहतील. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. 

तूळ - अचानक मोठा धनलाभ होईल. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. जुन्या गुंतवणुकीचा लाभ होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवास शक्यतो टाळा. दगदग होईल, अशी कामे करू नका. 

वृश्चिक -आर्थिक आवक चांगली राहील. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. जीवनसाथी चांगील साथ देईल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. 

धनू - एखादी महत्त्वाची माहिती कळेल. कामात अडचणी येतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. 

मकर - काहींना अचानक प्रवास करावा लागेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता येईल. प्रसिद्धी नावलौकीक वाढवणाऱ्या घटना घडतील. 

कुंभ - व्यवसायात भरभराट होईल. घऱात धार्मिक कार्याचे आयोजन केले जाईल. त्या निमित्ताने पाहुणे घरी येतील. भेटीगाठी होतील. आवडत्या खाद्य पदार्थांचा आस्वास घेता येईल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. 

मीन - प्रवास कार्यसाधक ठरतील. व्यवसायात बरकत राहील. एखाद्या मोठ्या सौद्याचा फायदा होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासमवेत मौजमजा करता येईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App