मेष- आपल्य अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. लोकांची चांगली मदत होईल. महत्त्वाची कामे दुपारच्या सत्रात हाती घ्या. काहीना प्रवास करावा लागेल. दिवसाची सुरुवात थोडी दगदगीने होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.
वृषभ- दिवसाची सुरुवात चांगल्या घटनांनी होईल. वसुलीची कामे रेंगाळत ठेवल्यास ती लांबणीवर पडतील. महत्त्वाची कामे सकाळच्या सत्रात पूर्ण करून घ्या. जीवनसाथीची चांगली साथ राहील. प्रेमात सफलता मिळेल, वाहने जपून चालवा.
मिथुन- दिवसाचीसुरुवात थोड़ी चाचपडत होईल. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाची कामे दुपारच्या सत्रात हाती घ्या. तोपर्यंत कामाचे नियोजन करून ठेवा. खाण्यापिण्याचे तंत्र सांभाळा. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद) मिळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील.
कर्क- महत्त्वाची कामे सकाळच्या सत्रात आटोपून घ्या. तुमच्या योजनांची माहिती इतरांना सांगत बसू नका. फार दगदग होईल अशी कामे करू नका. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक आवक चांगली राहील.
सिंह- नवीन संधीचा पुरेपूर फायदा करून घ्याल. मनोरंजनासाठी वेळ देता येईल. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. फायदे होतील. कामाचा ताण कमी राहील. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
कन्या- जवळच्या सहलीला जाऊन याल. भावडांशी सख्य राहील. व्यवसायात भरभराट होईल. मात्र बाजारपेठेचा अभ्यास करून निर्णय घ्या. नोकरीत काही बदल होऊ शकतात. काही कटकटी असतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
तूळ- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. मित्र, सहकारी यांची चांगली साथ राहील. काहीना प्रवास घडून येईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.
वृश्चिक- मनात प्रसन्न विचार राहतील. प्रेमात असणाऱ्यांना अनुकूल प्रतिसाद मिळेल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. त्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल. व्यवसायात यशस्वी व्हाल.
धनू- दिवसाची सुरुवात काही अडचणीने होईल. मात्र त्यातून मार्ग निघेल. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. महत्त्वाची कामे दुपारच्या सत्रात हाती घ्या. क्रोधावर नियंत्रण ठेवा. मित्रमैत्रिणीशी गैरसमज होऊ शकतात. अनावश्यक खर्चाला आवर घाला.
मकर- महत्त्वाची कामे सकाळच्या सत्रात पूर्ण करा. या काळात वसुलीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. चांगल्या बातम्या कळतील. त्यामुळे दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. कलाकारांना प्रसिद्धी मिळेल.
कुंभ- नोकरी, व्यवसायात अनुकूल स्थिती राहील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील.
मीन- प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मौजमजा करण्याच्या निमित्ताने प्रवास घडून येईल. मुलांची प्रगती होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. नोकरीत अनुकूल घटना घडतील.