मेष- महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. लोकांना नाराज करू नका. प्रवास शक्यतो टाळा, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. आवडते भोजन मिळेल.
वृषभ- आपल्या अनेक अडचणी दूर होतील. मनावरील ताण निघून जाईल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. प्रेमात असणाऱ्यांना अनुकूल प्रतिसाद मिळेल. विवाहेच्छूसाठी अनुकूल वातावर आहे. चांगली स्थळे चालून येतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.
मिथुन- महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. काही छुपे शत्रू डोके वर काढतील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. जीवनसाथीशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. चैनीवर खर्च होईल.
कर्क- नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. एखाद्या उपक्रमात सहभागी व्हाल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानी पडतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे.
सिंह- नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. सुखसोयी वाढवून मिळतील. कामाचा ताण कमी राहील. घराच्या सजावटीसाठी पैसे खर्च केले जातील, नवीन व्यवसायाच्या संधी मिळतील. घरी पाहुणे येतील.
कन्या- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. कामाचा ताण व्यवस्थित हाताळा. काहींना मौजमजा करण्यासाठी प्रवास घडून येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मुलांचे कौतुक होईल. जीवनसाथीची साथ राहील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही.
तूळ- महत्त्वाची कामे पूर्ण होतील. त्यामुळे मनावरचे ओझे कमी होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. समाजात तुमचा गौरव होईल. आवडत्या छंदासाठी वेळ द्या.
वृश्चिक- विविध प्रकारचे लाभ होतील. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. जनसंपर्क चांगला राहील. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. चांगल्या बातम्या कळतील. प्रेमात सफलता मिळेल.
धनू- कामाचा ताण राहील. थोडे नियोजन करून कामे करण्याची गरज आहे. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र त्यामुळे नाउमेद न होता संयम बाळगा. वड्याचे तेल वांग्यावर काढू नका. लोकांना नाराज करू नका. काहींना नवीन संधी मिळतील.
मकर- आर्थिक आवक चांगली राहील. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. भेटवस्तू मिळतील. कामानिमित्त धावपळ होईल. काही कामे मनासारखी होणार नाहीत. त्यामुळे थोडी चिडचिड होऊ शकते. आरामात बसणे होणार नाही. मुलांची प्रगती होईल.
कुंभ- नोकरी, व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सोप्यारीतीने कामे पूर्ण होतील. कामात उत्साह राहील. नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होतील. कामात उत्साहवर्धक बदल होतील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
मीन- शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. मनात आध्यात्मिक विचार राहतील. मुलांच्या यशामुळे आनंद होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या नावलौकिकात भर पडेल. नातेवाईक, मित्र यांच्या भेटी होतील.