आजचे राशीभविष्य : मेषसाठी हाती पैसा खेळता राहील अन् मिथुनसाठी जीवनसाथीशी सूर जुळतील

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-04-08 07:26:09 | Updated: April 8, 2023 07:26 IST

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

शनिवार, दि. ८ एप्रिल २०२३ राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १८, १९४५. तिथी चैत्र कृष्ण द्वितीया (सकाळी १० ११ वाजेपर्यंत) शालिवाहन शके १९४५. शोभन नाम संवत्सर, नक्षत्र : दुपारी १:५९ वाजेपर्यंत स्वाती. त्यानंतर विशाखा, रास तूळ, आज चांगला दिवस. (राहू काळ : सकाळी ९ ते २०:३० वाजेपर्यंत राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)

मेष- व्यवसायात मोठ्या उलाढाली फायदेशीर ठरतील. हाती पैसा खेळता राहील. नफ्याचे प्रमाण चांगले राहील. तुमच्या हातून चांगली कामे होतील. इतरांना मदत कराल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे सांभाळा. अनोळखी व्यक्तींना दूर ठेवा.

वृषभ- मित्र- मैत्रिणींना भेटण्याचीसंधी मिळेल. त्यांच्यासमवेत मजेत वेळ जाईल. मनावरचा ताण हलका होईल. पैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. तुमच्या कामाची लोकांकडून वाहवा होईल. छंदासाठी वेळ काढा.

मिथुन- आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र, अनावश्यक खर्च होईल. सहकारी तुमच्याकडून जास्त कामाची अपेक्षा करतील. मात्र, - तुम्हाला ते शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांची थोडी निराशा होईल. जीवनसाथीशी सूर जुळतील. आवडते पुस्तक वाचा.

कर्क- महत्वाच्या घडामोडी घडतील. आनंदवार्ता समजतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. विविध खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल. आर्थिक परिस्थिती भक्कम राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील. एखादी भेटवस्तू देण्यास हरकत नाही.

सिंह- नवीन ओळखी होतील. मित्र-मैत्रिणीना भेटण्याची संधी मिळेल. त्यांच्यासमवेत मौजमजा करता येईल. - आर्थिक देवाणघेवाण करताना खबरदारी घ्या. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. वडीलधाऱ्याचा आशीर्वाद मिळेल.

कन्या- तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. जीवनसाथीशी किरकोळ कारणावरून वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक 

तूळ - जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. तुमचे निरीक्षण फायदेशीर ठरेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. काहीना भेटवस्तू मिळतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. कामात उत्साह राहील. मुलांना योग्य संधी मिळेल. त्यांचे कौतुक होईल.

वृश्चिक- नोकरी व्यवसायात काहीतरी नावीन्यपूर्ण प्रयोग करून पाहिले जातील. त्यातून तुमचा फायदा होईल. नावलौकिक वाढेल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. समाजात तुमचा गौरव होईल. जोडीदार चांगली साथ देईल. परीक्षा देणायांना चांगला काळ आहे.

धनु- मनावरील ताण कर्मी होईल. अनेक समस्या सुटतील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. जीवनसाथीशी वाद टाळा. चांगल्या लोकांच्या सहवासात याल. चांगल्या बातम्या कळतील. काहीना जवळच्या सहलीला जाण्याचा योग येईल. मनात उत्साह राहील.

मकर- नोकरीत अनुकूल वातावरण राहील. कामात उत्साह राहील. तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडेल. जीवनसाथीशी गैरसमजातून मतभेद होऊ शकतात, घरी जवळचे मित्र, नातेवाईक येतील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

कुंभ- नवनवीन संधी मिळतील. उत्पन्नाचे स्रोत वाळतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. कामाचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार कामे करा. म्हणजे कमी श्रमात जास्त कामे होतील व करमणुकीसाठी वेळ मिळेल. एखादे पुस्तक वाचा.

मीन- एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. त्यामुळे तुमचा फायदा होईल. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. 

- विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)

 

टॅग्स :फलज्योतिष
Open in App