मेष- विविध प्रकारचे लाभ होतील. सरकारी कार्यालयात अडकलेली कामे मार्गी लागतील. त्यासाठी थोडे सकारात्मक पद्धतीने प्रयत्न करा. आर्थिक आवक मनासारखी राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. जवळचा प्रवास होईल.
वृषभ- नोकरीत नवीन बदल होतील. त्यात तुमचा फायदा होईल. पगारवाढ, बढती मिळू शकते. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. घरी पाहुणे येतील. जीवनसाथीचे मन मोडू नका.
मिथुन- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक आवक सामान्य राहील, भावंडांशी सख्य राहील. जवळच्या सहलीला जाऊन याल. आर्थिक उलाढाली जपून करा. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. मनात सकारात्मक विचार राहतील, असे प्रयत्न करा.
कर्क - आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. प्रगतीला पूरक वातावरण राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे मार्गी लागतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. नोकरीत कामाचा ताण राहील. मात्र, तुमचे महत्त्व वाढेल.
सिंह - आपल्या अनेक अडचणी दूर होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. भागीदारांचे चांगले सहकार्य मिळेल. घरात किरकोळ कारणावरून वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या.
कन्या - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्चाना आवर घातला पाहिजे. आर्थिक आवक सामान्य राहील. नोकरीत संयमाने वागणे आवश्यक आहे. जीवनसाथीच्या सल्ल्याने वागणे योग्य ठरेल.
तूळ - महत्त्वाची कामे करण्यासाठी अनुकूल काळ आहे. सोप्या रीतीने कामे होतील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. आर्थिक आवक मनासारखी राहील, प्रवासकार्य साधक ठरतील. तुमचा नावलौकिक वाढवणाच्या घटना घडतील. मुलांची प्रगती कळेल.
वृश्चिक- नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. पदोन्नतीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. पगारवाढ व इतर लाभ होतील. घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्यानिमित्त पाहुणे येतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळेल.
धनू - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. भाग्याची चांगली साथ राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घराची शोभा वाढविण्यासाठी एखादी नवीन वस्तू खरेदी कराल. प्रवास होईल.
मकर - आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अचाट साहस करण्याच्या भानगडीत पडू नका. नवीन ओळखी होतील. त्यातून तुमचा फायदा होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.
कुंभ- ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. अडचणी दूर होतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. आर्थिक आवक चांगली राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल.
मीन-: सामान्य ग्रहमान राहील. तुमची पाठ फिरताच लोक निंदा करतील. मात्र त्यांचे किती मनावर घ्यायचे, हे तुम्हीच ठरवा, मुलांकडे लक्ष द्या. त्यांना काय हवे, नको ते विचारा. घरासाठी खर्च कराल. नातेवाइकांच्या संपर्कात राहा.