आजचे राशीभविष्य- ०६ एप्रिल २०२३: नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील, घरात आनंदी वातावरण राहील; स्वतः वरचा विश्वास अजून वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-04-06 07:33:49 | Updated: April 6, 2023 07:33 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १६, १९४५. तिथी : चैत्र शुक्ल पौर्णिमा (सकाळी १०.०५ पर्यंत) शालिवाहन शके १९४५, शोभन नाम संवत्सर. नक्षत्र : दुपारी १२.४२ पर्यंत हस्त. त्यानंतर चित्रा. रास दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री १.११ पर्यंत कन्या. त्यानंतर तूळ, आज चांगला दिवस. हनुमान जयंती, वैशाख स्नानारंभ. राहू काळ : दुपारी १.३० ते ३ (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा. )

मेष- महत्त्वाची माहिती कळेल. स्वतः वरचा विश्वास अजून वाढेल. कामात उत्साह राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य नोकरी मिळेल. कामात टाळाटाळ करू नका. आपण चालढकल केली तर इतर लोक त्याचा गैरफायदा घेतील.

वृषभ- उत्साहाने कामे कराल तर अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. तुम्हाला नकारात्मकतेकडे वळवणाऱ्या लोकांपासून दूर राहा. काहींना प्रवास घडून येतील. प्रवासात सतर्क राहा. आपली महत्त्वाची माहिती इतरांना सांगू नका. महत्त्वाच्या घडामोडी घडतील.

मिथुन- नोकरी अनुकूल वातावरण राहील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. आपली अडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. योग्य सल्ला मिळेल, मात्र तो अमलात आणला पाहिजे. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील.

कर्क- तुमच्या हातून चांगली समाजसेवा घडेल. मात्र फार दगदग होईल अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. अन्यथा कामे झाली नाहीत म्हणून लोक तुमच्यावर टीका करतील. मुलांच्या प्रगतीच्या वार्ता कानी पडतील. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा.

सिंह- तुमचा जनसंपर्क वाढेल. नवीन ओळखी होतील. तुमच्या बोलण्याला मान दिला जाईल. नोकरीत कामाचा ताण राहील. काहींना जवळच्या प्रवासाचे योग येतील. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. जीवनसाथीशी वाद टाळा.

कन्या- व्यवसायात तुमचे आडाखे बरोबर ठरतील. नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील. इतरांच्या भानगडीत नाक खुपसू नका. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील.

तूळ - आपली प्रलंबित कामे गती घेतील. मनासारखी कामे होतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. विविध मार्गानी आर्थिक प्राप्ती होईल. काही अनपेक्षित लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. आपल्या मार्गातील अनेक अडचणी दूर होतील. शिक्षणात प्रगती होईल.

वृश्चिक- व्यवसायात भरभराट होईल. चांगल्या संधी मिळतील. काहींना पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. हातून चांगली कामे होतील.

धनू- नोकरीत सतत कार्यरत राहावे लागेल. नीट लक्ष देऊन वेळेच्या आत कामे पूर्ण करा. घरात आनंदी वातावरण राहील. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. काहींना भेटवस्तू मिळतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

मकर- देण्या- घेण्याचे व्यवहार जपून करा. कागदोपत्री व्यवहार करताना नीट वाचून मगच सही करा. तब्येतीची काळजी घ्या. फार दगदग होईल अशी कामे करू नका. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. लोकांशी मिळून मिसळून कामे करा.

कुंभ- आर्थिक प्राप्त प्रमाण समाधानकारक राहील. कामाचा ताण राहील. मात्र नियोजन करून कामे केली तर ताण जाणवणार नाही. लोकांशी सुसंवाद साधून कामे करून घ्या. लोकांच्या भेटीगाठी होतील. जवळच्या प्रवासाचे योग येतील.

मीन- शैक्षणिक प्रगती पुस्तक झळकते राहील. नवीन ज्ञानात भर पडेल. नातलगांच्या भेटी होतील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. काहींना प्रवास घडून येतील. घराच्या सजावटीसाठी पैसे खर्च कराल.

- विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)

टॅग्स :फलज्योतिष
Open in App